नवीन स्कॅम अलर्ट: नातेवाईक असल्याचे भासवून फसवणूक
अलीकडच्या काळात एक अत्यंत चकवणारा आणि धोकादायक प्रकारचा स्कॅम वाढताना दिसतोय. यामध्ये फसवणूक करणारे (स्कॅमर) स्वतःला तुमचा नातेवाईक किंवा जवळचा मित्र असल्याचा बनाव करतात आणि तुमच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या युक्त्या खूपच भावनिक आणि मनाला हलवणाऱ्या असतात .
ते कधी अपघाताचा बहाणा करतात, तर कधी वैद्यकीय उपचारांसाठी तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी करतात.
ही नवी फसवणूक थेट तुमच्या विश्वासाला आणि सहानुभूतीला टार्गेट करते, ज्यामुळे बर्याचदा लोक या जाळ्यात अडकतात. त्यामुळे अशा प्रसंगी सावध राहणे आणि डोकं शांत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Mike Tyson vs Jake Paul fight : स्क्रिप्ट लीक,जेक पॉल विजेता|टायसनच्या आरोग्यावरही मोठा प्रश्न!
या प्रकारचा स्कॅम इतका घातक का आहे?
सामान्यपणे, बनावट नोकरी ऑफर्स किंवा शेअर बाजारातील फसवणुका पटकन ओळखता येतात. पण या प्रकारच्या स्कॅममध्ये, स्कॅमर नातेवाईक असल्याचे भासवून तुम्हाला गोंधळात टाकतात. ते तुम्हाला तातडीचा निर्णय घ्यायला भाग पाडतात आणि तुमच्या भावनांचा फायदा घेतात.
जगभरात अशा प्रकारच्या फसवणुकीची अनेक उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ, काही स्कॅमर संकटात सापडलेल्या मुलांचे किंवा पालकांचे रूप घेऊन गळ घालतात.
अशाच प्रकारावर आधारित एक कथा “Thelma” या हॉलीवूड चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात एका वृद्ध महिलेला फोनवर सांगितले जाते की तिच्या पुतण्याचा अपघात झाला आहे आणि त्याला वैद्यकीय उपचारांसाठी तातडीने पैशांची गरज आहे. ती महिला मदतीचा हात पुढे करते, परंतु अखेरीस ती फसवणुकीला बळी पडते.
दुर्दैवाने, अशा फसवणुकीचे प्रकार आता भारतातही प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने याबाबत अधिक जागरूक आणि सावध राहणे आवश्यक आहे.
2000 ची SIP करा आणि मिळवा 3.18 crore लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये
फसवणुकीच्या प्रकारांपासून स्वतःचा बचाव कसा कराल?
हे स्कॅमर सोशल मीडिया, डेटा लीक आणि हॅकिंगचा वापर करून तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करतात. तुमची कुटुंबातील सदस्यांची नावे, तुमचा पत्ता, फोन नंबर अशा गोष्टी ते सहज शोधून काढतात. पण, काही महत्त्वाच्या पद्धतींचा वापर करून तुम्ही या फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करू शकता:
1 )कॉल करणाऱ्याची ओळख नीट तपासा:
जर कोणी नातेवाईक असल्याचे सांगून पैसे मागत असेल, तर थांबा! त्या व्यक्तीशी थेट संपर्क साधा. तातडीचा निर्णय घेण्याचा प्रयत्न टाळा. स्कॅमर बहुतेक वेळा परिस्थिती गंभीर असल्याचे भासवून तुमच्यावर दबाव आणतात. त्याला बळी पडू नका.
2) वैयक्तिक माहिती शेअर करू नका:
तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती कोणत्याही परिस्थितीत अनोळखी व्यक्तींना देऊ नका. खासकरून जर एखाद्या व्यक्तीने बर्याच वर्षांनंतर तुमच्याशी संपर्क साधून मदत मागितली, तर अधिक सतर्क राहा.
3) संशयास्पद वाटल्यास थेट संभाषण थांबवा:
जर तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा संशय आला तर संभाषण लगेच थांबवा. अशा परिस्थितीत तुमच्या अंतःप्रेरणेला (gut feeling) महत्त्व द्या.
4) फसवणुकीबद्दल माहिती ठेवा आणि इतरांनाही सांगा:
सध्याच्या फसवणुकीच्या प्रकारांबद्दल सतत अपडेट राहा. तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत यावर चर्चा करा. यामुळे तेही सावध राहतील आणि अशा प्रकारांच्या जाळ्यात अडकणार नाहीत.
5) पैसे पाठवण्याआधी खात्री करा:
कोणत्याही परिस्थितीत, कोणालाही पैसे पाठवण्याआधी त्या मागणीची शहानिशा करा. तातडीच्या मागणीमुळे भावनावश होऊन निर्णय घेऊ नका. प्रत्येक गोष्टीची नीट तपासणी करा.
अशा फसवणुकीबाबत कुठे तक्रार कराल?
जर तुम्ही अशा प्रकारच्या फसवणुकीचा बळी पडला असाल किंवा तुमच्या ओळखीच्या कोणी याबाबत माहिती दिली असेल, तर तातडीने पुढील ठिकाणी तक्रार नोंदवा:
📞 राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन (National Cyber Crime Helpline):
1930 (सकाळी 9 ते संध्याकाळी 6 दरम्यान उपलब्ध)
📞 सायबर पोर्टल:
www.cybercrime.gov.in
(येथे ऑनलाइन तक्रार नोंदवता येईल.)
📞 स्थानिक पोलीस स्टेशन:
तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून ही माहिती द्या.
तुमची सुरक्षा तुमच्या हातात आहे
आजकाल स्कॅमर सतत नवनवीन फसवणुकीचे प्रकार शोधत असतात. ते तुमच्या भावनांशी खेळून तुमच्याकडून आर्थिक फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच, नातेवाईक असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संभाषण करताना अधिक सावध राहा.
तुमची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती जपून ठेवा. फसवणुकीपासून बचावासाठी तुमची जागरूकता आणि सावधगिरी हीच तुमची सर्वात मोठी ढाल आहे. सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि इतरांनाही या गोष्टींबद्दल माहिती द्या.
“जागरूकता आणि सतर्कता हीच सुरक्षा आहे.”
2 thoughts on “सावधान! स्कॅमर नातेवाईक असल्याचे भासवून पैसे उकळत आहेत – तुमचं संरक्षण कसं कराल?”