संजू राठोडने इतिहास घडवला;1st मराठी गायक, ज्याला अ‍ॅलन वॉकरच्या कॉन्सर्टसाठी ओपनिंगचा मान मिळाला|Sanju Rathod Biography

WhatsApp Channel Follow Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Follow Now

Table of Contents

‘गुलाबी साडी’ गायक संजू राठोडने इतिहास घडवला

First Marathi singer Sanju Rathod honored of opening for Alan Walker’s concert :संजू राठोड गेल्या काही वर्षांत मराठी संगीताने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, ज्यामध्ये अनेक प्रतिभावंत गायकांचा मोठा सहभाग आहे. त्यामध्येच एक नाव येतं संजू राठोडचं. ‘गुलाबी साडी‘ आणि ‘नऊवारी’ या गाण्यांमुळे संजूने मराठी संगीताच्या दुनियेतील आपले स्थान निर्माण केले आहे. अ‍ॅलन वॉकरसारख्या आंतरराष्ट्रीय कलाकाराच्या शोमध्ये ओपनिंग करणारा संजू हा पहिला मराठी कलाकार ठरला आहे, ज्यामुळे मराठी संगीतासाठी ही ऐतिहासिक घटना ठरली आहे.

DJ Alan Walkar Pune Case| DJ Alan Walker च्या पुण्यातील शोमध्ये 36 मोबाइल चोरी,पोलिसांची मोठी कारवाई, चार आरोपी अटकेत!

म्युझिक कॉन्सर्टमध्ये, संजूने आपल्या ‘गुलाबी साडी’ या सुपरहिट गाण्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ‘गुलाबी साडी’ हे गाणं Spotify वर ५० मिलियनपेक्षा अधिक वेळा ऐकलं गेलेलं मराठी गाणं आहे. त्यानंतर त्याने नुकतेच प्रदर्शित झालेले ‘काळी बिंदी’ गाणं सादर केले, जे सध्या युट्युबच्या इंडिया टॉप म्युझिक व्हिडिओ चार्टवर आहे. त्याच्या जोरदार परफॉर्मन्सने प्रेक्षकांना अक्षरशः आनंदित केले. संजूच्या आधुनिक शैलीतील गाण्यांमुळे मराठी संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवण्याचा त्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.

अ‍ॅलन वॉकरच्या जागतिक इलेक्ट्रॉनिक साऊंडसोबत मराठी संगीताचे सुंदर प्रदर्शन करून, संजूने इतर प्रादेशिक कलाकारांसाठीही नवीन मार्ग दाखवला आहे.

संजू राठोड singing at alan walkar concert
Sanju Rathod Singing At Alan Walker Concert

या संधीविषयी बोलताना संजू म्हणाला, “अ‍ॅलन वॉकरसारख्या प्रसिद्ध कलाकारासमोर परफॉर्म करणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान होता. मराठी संगीताला आंतरराष्ट्रीय मंचावर नेण्याची ही संधी मिळाल्यामुळे मी खूप आनंदी आहे.” त्याच्या चाहत्यांनीदेखील कॉन्सर्टबद्दल उत्साह व्यक्त केला.

Believe कंपनीच्या आर्टिस्ट सर्विसेसच्या डायरेक्टर शिल्पा शारदा यांनी म्हटले, “संजू राठोडसोबतच्या या कोलॅबोरेशनमुळे आम्हाला खूप अभिमान वाटतो. संजू हा सनबर्न एरेनात परफॉर्म करणारा पहिला मराठी कलाकार आहे. त्याची अप्रतिम गाणी अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे *गुलाबी साडी हे त्यापैकी एक गाणं आहे*.”

success story : इन्व्हर्टरमधून उभी राहिलेली 2300 कोटींची ही कंपनी

आयुष्मान वय वंदना कार्ड| ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच लाखांचा मोफत विमा! असे काढा घर बसल्या ,संपूर्ण माहिती Ayushman Card

संजू राठोड बद्दल संपूर्ण माहिती  Sanju Rathod Biography

संजू राठोड हे नाव मराठी संगीत जगतात झपाट्याने लोकप्रिय होत आहे. त्यांच्या “नऊवारी साडी,” “डोरलं,” “बुलेट वाली,” आणि “गुलाबी साडी” यांसारख्या गाण्यांनी महाराष्ट्राला थिरकवले आहे. संजू राठोडची संगीतक्षेत्रातील ही ओळख मात्र एका प्रेरणादायी प्रवासातून निर्माण झाली आहे.

शिक्षण व गर्लफ्रेंड Sanju Rathod Education & Girlfriend

संजूचा जन्म १ जुलै २००३ रोजी जळगाव जिल्ह्यातील धानवड तांडामध्ये झाला. त्यांचे बालपण अत्यंत साध्या परिस्थितीत गेले असून, शालेय शिक्षण ते १०वीपर्यंत होस्टेलमध्ये घेतले. पुढे डिप्लोमासाठी प्रवेश घेतलेल्या संजूला शिक्षणाच्या काळातच एका मुलीवर प्रेम झाले. तिची आवड असलेल्या गायक Yo Yo Honey Singh मुळे संजूने रॅप संगीताकडे ओढा घेतला. काही काळानंतर त्यांच्या नात्यातील तणावाने संजू खूप खचला, आत्महत्या करण्याचा विचारही त्याच्या मनात आला. परंतु, याच वेळी संजूने स्वतःचे रॅप गाणे लिहिण्यास सुरुवात केली, आणि संगीत त्याचे जीवन बनले.

अशी झाली संजुची यूट्यूबचा सुरुवात Sanju Rathod YouTube Journey

संजूने स्वतःचे गाणे यूट्यूबवर अपलोड करून आपल्या कला प्रवासाची सुरुवात केली. त्याच्या घरी त्याच्या संगीताविषयी काहीच माहिती नव्हती, पण तो स्वतःच्या पैशातून गाणी बनवू लागला. काही वेळा व्याजाने पैसे घेत त्याने संगीत निर्मितीत गुंतवणूक केली, पण त्यामुळे कर्जाचा बोजा वाढत गेला. या आर्थिक समस्यांमुळे घरी लोक पैसे मागण्यासाठी येत असतानाही संजूने आपला संघर्ष सोडला नाही. त्याच्या या मेहनतीचे फळ त्याला त्याचे पहिले हिट गाणे “बाप्पा वाला गाणं” याच्या रूपात मिळाले, ज्यावर अभिनेता रितेश देशमुखने रील बनवली होती. यानंतर संजूने मागे वळून पाहिले नाही. एकामागून एक हिट मराठी गाणे त्याने दिले, ज्यात “नऊवारी पाहिजे,” “बुलेट वाली,” आणि “गुलाबी साडी” यांचा समावेश आहे. ही गाणी सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाली.

स्वप्ने व भविष्यातील इच्छा Future Dreams

संजू राठोडला आपली कुटुंबीयांसाठी काही खास स्वप्ने आहेत. त्याला मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे, तसेच गावात आई-वडिलांसाठी घर व गाडी घेण्याचे आहे. आजही त्याचे वडील काम करतात, पण संजूला त्यांना सुखात ठेवायचे आहे. संजूचे संपूर्ण भारतभर मराठी संगीताचे कॉन्सर्ट करण्याचे स्वप्न आहे.

संजूची मेहनत सिनेसृष्टीतील लोकांनीही ओळखली आहे, ज्यामुळे त्याला अनेक मोठमोठ्या प्रोजेक्ट्सची ऑफर मिळाली आहे. त्याला हिंदी सिनेसृष्टीतूनही ऑफर्स येत आहेत, आणि अनेक हिंदी कलाकार त्याच्या गाण्यांवर रील तयार करत आहेत. संजूची गाणी फक्त महाराष्ट्रातच नाही, तर भारताबाहेरही लोकप्रिय होत आहेत, आणि अनेक नामांकित संगीतकार त्याच्या प्रतिभेचे कौतुक करत आहेत.

संगीताच्या माध्यमातून संघर्षाचा सामना कसा करावा, हे संजूच्या प्रवासातून आपल्याला शिकायला मिळते. त्याच्या मेहनतीची कहाणी आजच्या तरुणांना प्रेरणा देणारी आहे.

संजू राठोडची गाणी सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत. त्याच्या आगामी गाण्यांच्या अपडेटसाठी त्याला सोशल मीडियावर फॉलो शकता.

 अशाच प्रकारची माहिती तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये वाचू शकता ,तसेच आमच्या instagram पेज ला फॉलो करू शकता.

ओबेन इलेक्ट्रिक Rorr EZ ई-बाईक लाँच: किंमत, रेंज, फीचर्स आणि बुकिंग माहिती २०२४

FAQ? संजू राठोड बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न?

1. संजू राठोड कोण आहे?

संजू राठोड एक मराठी गायक आहे ज्याने “गुलाबी साडी” आणि “नऊवारी साडी” यांसारख्या हिट गाण्यांनी लोकप्रियता मिळवली आहे.

2. संजू राठोडचा जन्म कुठे झाला?

संजू राठोडचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धानवड तांडा येथे झाला.

3. संजू राठोडने गाण्याची सुरुवात कधी केली?

संजूने आपले  *बप्पा वाला गाणं* पहिले गाणे यूट्यूबवर अपलोड केले आणि तिथून त्याच्या संगीत प्रवासाला सुरुवात झाली.

संजू राठोडच्या कोणत्या गाण्याला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली?

संजूच्या “गुलाबी साडी” गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली, आणि ते Spotify वर ५० मिलियनपेक्षा अधिक वेळा ऐकले गेले आहे.

अ‍ॅलन वॉकरच्या कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करणारा पहिला मराठी गायक कोण आहे?

अ‍ॅलन वॉकरच्या शोमध्ये परफॉर्म करणारा संजू राठोड हा पहिला मराठी गायक आहे.

संजू राठोड चे शिक्षण कितवी पर्यंत झाले आहे ?

संजूने 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असून, त्यानंतर डिप्लोमासाठी प्रवेश घेतला

7.संजू राठोडचे आदर्श कोण आहेत?

संजू राठोडला हिंदी गायक Yo Yo Honey Singh यांच्यामुळे प्रेरणा मिळाली आहे.

Spread the love

1 thought on “संजू राठोडने इतिहास घडवला;1st मराठी गायक, ज्याला अ‍ॅलन वॉकरच्या कॉन्सर्टसाठी ओपनिंगचा मान मिळाला|Sanju Rathod Biography”

Leave a Comment