Dagdusheth Halwai Ganapati Replica Temple Now in Thailand: नमस्कार मित्रानो! स्वागत आहे आपल्या कोथरुडकर.कॉम च्या वेबसाईट वर। पुण्याचे व संपूर्ण जगभरातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे आता थायलंड मध्ये सुध्दा भक्त आहे.
या भक्त मंडळींनी, थायलंडच्या फुकेत (Fuket) येथे दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिराची आणि मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती बांधण्यात आली आहे. लवकरच या मंदिरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना होणार असून, थायलंडमधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा भक्तांसाठी हे दर्शन आणि पूजा करण्याचे केंद्र ठरणार आहे. या निमित्ताने पुण्यातील ऐतिहासीक लाल महाल ते दगडूशेठ गणपती मंदिरापर्यंत मूर्तीचा उत्सव सोहळा देखील साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला श्रीमंत दगडूशेठ ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, खजिनदार महेश सूर्यवंशी आणि इतर ट्रस्टी मंडळी व श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे स्वयंसेवक उपस्थित होते.
मंदिराबद्दल महत्वाची माहिती :
महत्त्वाचे मुद्दे | तपशील |
ठिकाण | थायलंडच्या फुकेत येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. |
उद्घाटन सोहळा | लवकरच विधीवत प्रतिष्ठापना होऊन मंदिर भक्तांसाठी खुले होणार आहे. |
उद्दिष्ट | थायलंडमधील भक्तांना पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन मिळवण्याची संधी. |
उंची | मंदिराची उंची अंदाजे ५० फूट आहे. |
स्थापना करणारे | फुकेत 9 रिअल इस्टेट कंपनीच्या अध्यक्षा पापासॉर्ण मिपा यांच्या आर्थिक सहकार्याने मंदिर उभारले आहे. |
मूर्ती प्रकार | १) मुख्य मूर्ती (दगडूशेठ गणपती)२) पंचधातूची लहान मूर्ती३) सिद्धी माता आणि बुद्धी मातेच्या मूर्ती४) श्री लक्ष आणि श्री लाभ यांच्या मूर्ती |
मंदिराच्या बांधणीसाठी लागलेला वेळ | मंदिराचे बांधकाम १५ महिन्यांत पूर्ण झाले. |
एकूण खर्च | मंदिराच्या बांधणीवर सुमारे ९ कोटी रुपये खर्च आले. |
विशेष | श्री गणेशाचे दागिने आणि गणेश यंत्र देखील येथे आहेत. |
पायाभरणी सोहळा तारीख | जुलै २०२३ |
दगडूशेठ हलवाई गणपती मुळे उभा राहिली करोडो रुपयांची कंपनी: Dagdusheth Halwai Ganapati Replica Temple Now in Thailand
फुकेत रिअल इस्टेट कंपनी लिमिटेडच्या अध्यक्षा आणि उद्योजिका पापासॉर्ण मिपा या देखील उपस्थित होत्या.
पापा सोन मिपा शहाजी पत्र्याच्या घरामध्ये राहत होत्या परंतु श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या कृपेमुळे त्यांचे आज करोडो रुपयांची कंपनी उभा राहिले आहे. बांधकाम क्षेत्रामध्ये मिळालेली प्रगती ही फक्त गणेशामुळेच झालेली आहे असा त्यांचा विश्वास आहे. त्या म्हणाल्या की ,थायलंडमध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती वरती भक्तांची श्रद्धा व विश्वास खूप आहे परंतु थायलंड ते पुणे अंतर खूप असल्यामुळे श्रीमंत दगडूशेठ गणपती चे दर्शन घेण्यासाठी सर्वजण येथे येऊ शकत नाहीत. गणपतीचे गणपतीचे दर्शन सर्व थायलंड मधील भक्तांसाठी , या प्रयत्नांमुळे मिळू शकेल. अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.
या प्रकल्पाचे संपूर्ण नियोजन आणि आर्थिक जबाबदारी पापासॉर्ण मिपा यांनी घेतली आहे. ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी चेतन लोढा यांनी या प्रकल्पासाठी विशेष सहकार्य केले.
दगडूशेठ हलवाई ट्रस्ट व भारतीयांमुळे मंदिर बनवणे झाले शक्य : Dagdusheth Halwai Ganapati Replica Temple Now in Thailand
पापासॉर्ण मिपा यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले, “श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आशीर्वादाने आम्हाला हे काम साध्य करणे शक्य झाले. दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि भारतीय समाजाच्या सहकार्यामुळेच हे मंदिर उभे राहू शकले. या योजनेवर पंतप्रधान देखील लक्ष ठेवून आहेत.”
‘श्री श्रीमंत गणपती बाप्पा मंदिर’ नावाने ओळखले जाणारे मंदिर : Dagdusheth Halwai Ganapati Replica Temple Now in Thailand
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, “थायलंडमध्ये गणपती मंदिराची स्थापना भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे. फुकेटच्या रावई बीच जवळ ५० फुटांचे हे मंदिर ‘श्री श्रीमंत गणपती बाप्पा मंदिर’( Lord Shreemant Ganpati Bappa Temple) या नावाने ओळखले जाईल. त्यामुळे आता थायलंडमधील गणेश भक्तांना थेट दगडूशेठ बाप्पाचे दर्शन घेता येईल.”
रासने यांनी सांगितले की,
1) मुख्य मूर्तीशिवाय ( पंचधातूची एक छोटी मूर्ती)
2) सिद्धी मातेची,
3)बुद्धी मातेची,
4) श्री लक्ष आणि
4) श्री लाभ यांच्या मूर्ती देखील येथे स्थापित केल्या जातील.
पुण्यातील दगडूशेठ मंदिरासारखेच येथे शिवमंदिरही असेल. दगडूशेठ गणपतीची हुबेहूब प्रतिमा पुण्यात तयार करण्यात एक वर्ष व 20 दिवस लागले, आणि या प्रकल्पावर सुमारे ९ कोटी रुपये खर्च आले आहेत.
१५ महिन्यांत मंदिराचे बांधकाम पूर्ण | Dagdusheth Halwai Ganapati Replica Temple Now in Thailand
पापासॉर्ण मिपा यांच्या प्रयत्नामुळे व श्रद्धेने, जुलै २०२३ मध्ये मंदिराचा पायाभरणी सोहळा झाला होता, आणि सुमारे आता १५ महिन्यांनंतर बांधकाम पूर्ण झाले आहे. लवकरच फुकेत येथे भारतीय संस्कृतीनुसार विधीवत प्रतिष्ठापना करून मंदिर भक्तांसाठी खुले होईल. फुकेटमधील या मंदिरात गणेश यंत्राची स्थापना देखील करण्यात आली आहे. श्री गणपती आणि इतर देवतांसाठी खास दागिने तयार करण्यात आले आहेत.
आपला हा ब्लॉग कसा वाटला ही कमेन्ट सेक्शन मध्ये नक्की सांगा , आजून तुम्हाला कोणत्या विषयावरती माहिती वाचायला आवडेल , हे पण नक्की सांगा .व नवीन अपडेटस मिळवण्यासाथी आपल्या whatsapp ,telegram ग्रुप्स ला जॉइन करा . धन्यवाद !
FAQ’S वारंवार विचारले जाणरे प्रश्न
१. फुकेत येथील हे नवीन मंदिर कोणत्या देवाला समर्पित आहे?
हे मंदिर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला समर्पित आहे.
२. फुकेत येथे मंदिराच्या बांधकामासाठी किती वेळ लागला?
मंदिर बांधण्यासाठी सुमारे १५ महिने लागले.
३. थायलंड मधील श्रीमंत दगडूशेठ मंदिराची उंची किती आहे?
मंदिराची उंची अंदाजे ५० फूट आहे.
४. मंदिरात कोणत्या प्रकारची मूर्ती आहे?
येथे दगडूशेठ गणपतीची मूळ मूर्तीची हुबेहुब प्रतिकृती आहे.
५. भक्तांसाठी मंदिर कधी खुले होणार आहे?
आजुन हे मंदिर खुले केलेल नाही ,प्राणप्रतिष्ठा विधीनंतर लवकरच हे मंदिर भक्तांसाठी खुले होईल.
पुण्यातील धक्कादायक घटना ,खून की मृत्यू ?Dead body of 60 yr Old Man found On Sinhagad Fort
4 thoughts on “थायलंडमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची प्रतिकृती | Dagdusheth Halwai Ganapati Replica Temple Now in Thailand 2024”