Pune Zudio Franchise Fraud : पुण्यात व्यावसायिकाची 10 लाख रुपयांची फसवणूक – बनावट ‘झुडिओ फ्रँचायझी’ घोटाळा उघडकीस

WhatsApp Channel Follow Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Follow Now

Fake Zudio Franchise Case in Pune Pune News 18 dec :पुणे शहरातील एका व्यावसायिकाला बनावट झुडिओ फ्रँचायझी मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल 10 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. सायबर गुन्हेगारांनी बनावट वेबसाईट आणि फोन कॉल्सचा वापर करत, या व्यावसायिकाला फसवलं. सध्या सायबर क्राइम पोलीस आणि खडक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

zudio fraud in pune
पुण्यात व्यावसायिकाची 10 लाख रुपयांची फसवणूक – बनावट ‘झुडिओ फ्रँचायझी’

पुण्यात व्यावसायिकाची 10 लाख रुपयांची फसवणूक: अशी घडली संपूर्ण घटना ! Pune Zudio Franchise Fraud Case Details

ही घटना एका 65 वर्षीय व्यावसायिकासोबत घडली आहे, जो पुण्यातील एक पेंट डीलर आहे. ऑनलाइन जाहिरातीमध्ये झुडिओ फ्रँचायझी मिळवण्याची संधी असल्याचं त्याला दिसलं. व्यवसाय वाढवण्याच्या इच्छेतून त्याने त्या जाहिरातीवर क्लिक केलं आणि दिलेल्या लिंकद्वारे अर्ज भरला.

अर्जामध्ये त्याने वैयक्तिक माहिती, व्यावसायिक तपशील, आणि आर्थिक माहिती दिली. हे सगळं करताना त्याला त्या जाहिरातीच्या सत्यतेबद्दल शंका आली नाही.

सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा जाळा | Cyber scam thorugh Ads on social media 

अर्ज सबमिट केल्यानंतर लगेचच त्याला एका व्यक्तीचा फोन आला. तो स्वतःला झुडिओचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचं सांगत होता. त्या व्यक्तीने त्याला सांगितलं की, “तुमचा अर्ज मंजूर झाला आहे आणि लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संपर्क साधला जाईल.”

काही तासांतच दुसऱ्या एका व्यक्तीकडून फोन आला. तो स्वतःला झुडिओ कंपनीचा वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवत होता. त्याने व्यावसायिकाकडून आयकर कागदपत्रे, बँक डिटेल्स आणि कंपनीचे व्यवहार नोंदी मागवल्या.

जुडीओ zudio franchise fraud in pune

10 लाख रुपयांची रक्कम गमावली पण अशी झाली व्यावसायिकाला फसवणुकीची जाणीव | 10 lakh rs fake zudio Franchise scam in pune 

सायबर गुन्हेगारांनी मोठ्या हुशारीने या व्यावसायिकाचा विश्वास जिंकला. सुरुवातीला त्यांनी त्याच्याकडून ₹49,000 नोंदणी शुल्क म्हणून घेतले. नंतर, ₹10 लाख करार शुल्क म्हणून भरायला लावले.

व्यावसायिकाला सांगण्यात आलं की, लवकरच औपचारिक करारपत्रं त्याच्या स्वाक्षरीसाठी पाठवली जातील. मात्र, त्यानंतरही आणखी एक कॉल आला, ज्यामध्ये ₹25 लाखांची मागणी करण्यात आली. हे पैसे फ्रँचायझी दुकानासाठी कपडे आणि स्टॉक खरेदीसाठी असल्याचं सांगण्यात आलं.

₹25 लाखांची मागणी झाल्यावर व्यावसायिकाला शंका आली. त्याने झुडिओ कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर तपास केला आणि त्याला कळलं की, झुडिओ फ्रँचायझीबाबत हा संपूर्ण व्यवहार बनावट आहे. यानंतर त्याने तात्काळ सायबर क्राइम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

फसवणुकीच्या तपासासाठी पोलीस कारवाई सुरू | Case Registered at Police Station

सायबर क्राइम पोलिसांनी तक्रार नोंदवल्यानंतर, हा गुन्हा खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) नोंदवण्यात आला आहे. सायबर गुन्हेगारांनी वापरलेले बँक खाते, फोन नंबर आणि बनावट वेबसाइट यांची चौकशी सुरू आहे.

ही घटना पुन्हा एकदा स्पष्ट करते की, सायबर फसवणुकीचा धोका किती वाढला आहे. ऑनलाइन ऑफर्स किंवा आकर्षक योजनांवर विश्वास ठेवण्याआधी योग्य तपासणी करणे गरजेचे आहे. सायबर गुन्हेगार लोकांच्या भावनांचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत, त्यांना मोठ्या रकमेचा गंडा घालत आहेत.

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना: Important Tips For Citizen’s

  1. आकर्षक ऑफर्सची खातरजमा करा: कोणत्याही जाहिरातीवर क्लिक करण्याआधी, त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर तपास करा.
  2. व्यक्तिगत माहिती शेअर करताना काळजी घ्या: कोणालाही आपली बँक डिटेल्स, ओळखपत्रं किंवा आर्थिक माहिती सहजासहजी देऊ नका.
  3. मोठ्या रकमेचा व्यवहार टाळा: कोणत्याही व्यवहारासाठी रक्कम भरण्याआधी योग्य कागदपत्रं आणि खातरजमा मागा.
  4. सायबर पोलिसांची मदत घ्या: फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर क्राइम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा.

read also : Cyber Parcel Fraud Alert| पुण्यात इंजीनियर  आणि खाजगी कर्मचारी १६.४८ लाखांच्या पार्सल फ्रॉडचे  बळी |काय आहे “पार्सल फ्रॉड” वाचा सविस्तर 

सावधान! स्कॅमर नातेवाईक असल्याचे भासवून पैसे उकळत आहेत – तुमचं संरक्षण कसं कराल?

पोलिसांचा संदेश – सतर्क राहा, सुरक्षित राहा | Be Careful From Pune Zudio Franchise Fraud & other 

खडक पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी सांगितलं की, “सायबर गुन्हेगारांसोबत व्यवहार करताना शंका असल्यास, कोणताही निर्णय घेण्याआधी पोलिसांशी संपर्क साधा.”

या प्रकारामुळे व्यावसायिकाला मोठा आर्थिक फटका बसला असून, भावनिक ताणही सहन करावा लागला आहे. फक्त आर्थिक नुकसानच नाही, तर अशा फसवणुकीमुळे माणसाचा विश्वासही डळमळीत होतो. त्यामुळे अशा घटनांना बळी पडू नये यासाठी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे.

 सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगून, कोणत्याही आर्थिक व्यवहाराच्या आधी योग्य चौकशी करावी. फक्त सतर्कता आणि वेळीच घेतलेली योग्य कृतीच अशा घटनांपासून आपले संरक्षण करू शकते.

read also : Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024 | सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

Pune नृत्य प्रशिक्षक अटकेत – दोन विद्यार्थिनींवरील अत्याचारप्रकरणी POCSO अंतर्गत कारवाई

Spread the love

1 thought on “Pune Zudio Franchise Fraud : पुण्यात व्यावसायिकाची 10 लाख रुपयांची फसवणूक – बनावट ‘झुडिओ फ्रँचायझी’ घोटाळा उघडकीस”

Leave a Comment