pune metro 2 new route: १) खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी २) नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग या दोन मेट्रो मार्गांना महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली आहे. यामुळे पुणे शहरातील मेट्रोचे जाळे चौफेर वाढणार आहे आणि भक्कम होणार आहे. या दोन मेट्रो प्रकल्पांसाठी राज्य सरकारने 9 हजार 897 कोटी रुपयांच्या निधिला मंजुरी दिली आहे. या मेट्रो मर्गाची लांबी 31.63 किमी असणार असून यामध्ये 28 स्थानकांची उभारणी होणार आहे.

खडकवासल्याहून खराडीकडे जाणाऱ्या मेट्रो मार्गामध्ये दळवीवाडी, नांदेड सिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे, राजाराम पूल, पु.ल. देशपांडे उद्यान, दांडेकर पूल, स्वारगेट स्थानक असणार असून पुढे हडपसर मार्गे खराडीला जाणार आहे. तर दुसरी मेट्रो नळस्टॉपपासून पौड फाटा, कर्वे पुतळा, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, वारजे, दौलत नगर (सनसिटी) या मार्गे माणिकबागेला जाणार आहे.
pune metro 2 new route| या दोन्ही मेट्रो मर्गिकेमुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार असून सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, मा.श्री. अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक धन्यवाद !
पुणे मेट्रो च्या टप्पा -२ च्या ३१.६४ किलोमीटर मार्गिकेला महाराष्ट्र शासनाची मान्यता आज दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्य शासनाने पुणे मेट्रोच्या टप्पा २ मधील खडकवासला – स्वारगेट – हडपसर – खराडी आणि नळ स्टॉप – वारजे – माणिकबाग या ३१.६४ किलोमीटर मार्गिकेला मान्यता दिली आहे. या मार्गिकांवर एकूण २८ स्थानके असणार आहेत. या दोन्ही मार्गिकांसाठी ९८९७.१९ कोटी इतका खर्च लागणार आहे राज्य शासनाच्या मान्यतेनंतर अंतिम मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. खडकवासला – स्वारगेट – हडपसर – खराडी या मार्गिकेची लांबी २५.५१८ किमी असून, या मार्गिकेवर २२ स्थानके असणार आहेत. या मार्गिकेसाठी ८१३१.८१ कोटी इतका खर्च येणार आहे. तसेच टप्पा २ मधील नळ स्टॉप – वारजे – माणिकबाग हा मार्ग ६.११८ किमी असून त्यात ६ स्थानके असणार आहेत. या मार्गासाठी १७६५.३८ कोटी रुपये खर्च येणार आहे. हे दोन्ही मार्ग संपूर्ण उन्नत असणार आहेत.
3 thoughts on “पुणे शहरासाठी आणखी दोन नवे मेट्रो मार्ग | pune metro 2 new route”