35 FIRE INCIDENTS IN 24 HRS: मित्रानो! ,स्वागत आहे आपल्या कोथरुडकर.कॉम च्या वेबसाईट वर, पुण्य मध्ये दिवाळीतील लक्ष्मी पूजेच्या दिवशी ३५ आगीच्या घटना,व एका घटणे मध्ये सॉफ्टवेअर इंजीनियर जखमी झाला आहे , अशा घटनांचे प्रमाण हे पुण्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे , तरी सुरुक्षेच्या दृष्टीने पुणेकरांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे . पुणे शहरात अलीकडेच तब्बल ३५ आगीच्या घटनांची नोंद झाली आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने शनिवारी वृताणा दिली. या घटना सुरवात शुक्रवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून ते शनिवारी सकाळी ७ वाजेपर्यंत झाली असून, सुदैवाने या घटनांमध्ये पुण्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनेचा तपशील | 35 FIRE INCIDENTS IN 24 HRS
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वृत्त माध्यमांशी बोलताना सांगितले की, “शुक्रवार रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत एकूण ३५ घटनांची नोंद अग्निशमन विभागाकडे झाले आहे. अग्निशमन विभागाची वाहनं कोणत्याही आपत्तीसाठी सज्ज आहेत असे त्यांनी सांगितले. अग्निशमन दलाचे वाहन, फोम इंजिन्स, रेस्क्यू वॅन्स यासारखी साधने २४ तास कार्यरत आहेत आहेत व योग्य ती मदत लवकरात लवकर पोहोचवली जाईल परंतु पुणेकरांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेणे महत्त्वाचे आहे.” अग्निशमनाच्या अधिकाऱ्यांनी असेही सूचित केले की, लक्ष्मीपूजेचा उत्सव संपेपर्यंत आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण सणांमध्ये फटाक्यांचा वापर दक्षता न घेता केला जात आहे.
या भागात घडल्या आगीच्या घटना | 35 FIRE INCIDENTS IN 24 HRS
35 जागी आगीच्या घटना च्या या भागातून घडल्या आहेत असे अग्निशमनद दलाने सांगितले . यामध्ये,शिवणे, लक्ष्मी रोड, टिळक रोड, वडगाव बुद्रुक, चंदननगर, औंध, कळयनिनगर, पद्मावती, हडपसर, बिबवेवाडी, कोंढवा आणि इतर भागांचा समावेश आहे.
धनोरी येथील सॉफ्टवेअर इंजिनियर ला झाली दुखापत | 35 FIRE INCIDENTS IN 24 HRS
Maharashtra’s Richest MLA Parag Shah: संपत्तीत ५७५% वाढ ,३३०० कोटींचा टप्पा गाठला
अजून एक दुर्दैवी अशी घटना म्हणजे धनौरी येथे सॉफ्टवेअर इंजिनियर ला फटाक्यामुळे झाली दुखापत, धनौरी येथील रीजेंसी मीडोज इमारतीत फटाके फोडल्यामुळे अचानक आग लागली व त्यामध्ये , माधवराज सॉफ्टवेअर इंजिनियर असणारा व तेथील रहिवासी यांच्या उजव्या हाताला त्या आगीमुळे जखम झाली. या आधीच्या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला तत्परतेने देण्यात आली होती, त्यानुसार तेथील स्थानिक अग्निशमन दलाने तत्काळ धनौरी येथील घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले व आग लवकरच विझवण्यात यश आले त्यामुळे सुदैवाने माधवराज सोडून कोणालाही दुखापत झाली नाही तसेच कोणत्याही इमारतीला या घटनेचा फटका बसला नाही.
जखमी झालेल्या माधवराजला त्वरित , जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले व आवश्यक फर्स्ट एड उपचारानंतर त्यांना सोडण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती चांगली असल्याचे समजले आहे.
कोणामुळे लागली आग | 35 FIRE INCIDENTS IN 24 HRS
अधिकाऱ्यांनी सीसीटीव्हीचा तपास घेतला असताना ,सीसीटीव्ही मध्ये सोसायटीची तीन मुले फटाके उडवत असताना दिसली.आग ही त्या फटकांमुळेच लागली असण्याची दाट शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी वर्तवले, तसेच अधिकारीही अचूक कारणांचा शोध घेत आहेत.
पोलीस प्रशासनाने केले नागरिकांना आवाहन
दिवाळी हा सण सर्वांनी आनंदाने साजरा केला पाहिजे त्यामध्ये नकळतपणे आनंदात दुःखाचे विघ्न पडू नये यासाठी नागरिकांनी स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे, व सतर्कने फटाके फोडून त्याचा आनंद घेतला पाहिजे. यामुळे त्यांची व त्यांच्या परिवाराची तसेच समाजाची पण सुरक्षितता टिकून राहील असे पोलीस प्रशासनाने लोकांना आवाहन केले.सणासुदीच्या काळात फटाक्यांमुळे होणाऱ्या संभाव्य आगीच्या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी पुण्यात अग्निशामक विभागाच्या वतीने जनजागृती सुरू आहे, आणि सुरक्षा उपायांचे पालन करण्याची विनंती करण्यात येत आहे.
तरी सर्वांनी आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी व दिवाळी आनंदाने साजरी करावी. धन्यवाद
! शुभ दिपावली!
हा लेख आपल्या मित्रांवर परिवारासोबत शेअर करून त्यांनाही सतर्क करावे व आपल्या इंस्टाग्राम, व्हाट्सअप या सोशल माध्यमांशी आमच्यासोबत जोडावे .
या दिवाळी मध्ये OTT वर काय पाहाल | OTT Diwali Week New Movies & Web series october
2 thoughts on “35 FIRE INCIDENTS IN 24 HRS | पुण्यात लक्ष्मी पूजेच्या दिवशी ३५ आगीच्या घटना, फटाक्यांमुळे सॉफ्टवेअर इंजीनियर जखमी”