प्राजक्ता माळी, सरपंच हत्या प्रकरण आणि धनंजय मुंडे: चर्चेचा भूकंप
Prajakta Mali & Dhananjay Munde News: नमस्कार मंडळी!आज आपण एका अशा चर्चेवर बोलणार आहोत, जी सध्या सोशल मीडियावर वादळ निर्माण करत आहे. प्राजक्ता माळी हे नाव एकेकाळी केवळ मराठी मनोरंजन विश्वात चमकत होतं, पण आता या नावाची चर्चा सरपंच हत्या प्रकरणाशी, राजकीय खेळीशी आणि धनंजय मुंडेंच्या नावाशी जोडली जात आहे. नेमकं काय चाललंय? सुरेश धस यांचं वक्तव्य आणि या वादाचा उगम कुठे आहे? चला, याचा सविस्तर उलगडा करूया.
जर तुम्हाला सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा. Join Now (click here )

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वादाचं केंद्रबिंदू
हे प्रकरण सुरू झालं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून. बीड जिल्ह्यातील या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या संदर्भात बोलताना सुरेश धस यांनी थेट धनंजय मुंडेंवर आरोप केला आणि त्याचबरोबर प्राजक्ता माळीचं नाव उघडपणे घेतलं.
पण प्राजक्ता माळीचं नाव या प्रकरणात कसं आलं? आणि सुरेश धस यांनी नेमकं काय म्हटलं? त्यांच्या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात आणि मनोरंजन विश्वात खळबळ उडवली आहे. त्यांनी म्हटलं की, “प्राजक्ता माळी प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या एकडे येतात बर का, चित्रपटात नवीन कुणाला काढायचं ,असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत .विभूती म्हणतो अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात प्राजक्ता ताई सुद्धा आमच्या इथं येतात त्या पण का याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता / संबंध तुम्हाला सापडायचा ,असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे .परळीचा हाही एक पॅटर्न
करुणा मुंडेंवरही फटकारा: राजकीय आरोप, की वैयक्तिक सुड?
प्राजक्ता माळींनी केवळ सुरेश धस यांनाच नाही, तर धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडेंनाही लक्ष्य केले. त्यांनी करुणा मुंडेंना सल्ला देत म्हटले की, “तुम्ही स्वतः एक महिला आहात. महिलांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजेत. पण जर महिला एकमेकींवर चिखलफेक करत असतील, तर समाजाचा काहीही फायदा होणार नाही.” माळींनी करुणा मुंडेंना विनंती केली की, त्यांनी सत्य तपासल्याशिवाय कोणतेही वक्तव्य करू नये.
प्राजक्ता माळीचं उत्तर आणि महिला आयोगात तक्रार
धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळी यांनी यावर प्रतिक्रिया दिली. त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केलं की, “हे आरोप निराधार आहेत आणि त्यांचा हेतू केवळ बदनामी करण्याचा आहे.” त्यामुळे प्राजक्ता माळी महिला आयोगात तक्रार दाखल करण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय.
धस यांचं म्हणणं मात्र वेगळं आहे. ते म्हणाले, “मी प्राजक्ता ताई म्हणून उल्लेख केला. याचा कुठलाही वाईट हेतू नव्हता.” पण यातून वादाला नवं वळण मिळालं आहे.
महिला कलाकारांना वारंवार लक्ष्य का केले जाते?”
प्रेस कॉन्फरन्समध्ये प्राजक्ता माळींनी धस यांच्या आरोपांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. “महिला कलाकार कोणत्याही वादात सहभागी होण्याचे टाळतात. मात्र, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या खोट्या आरोपांमुळे समाजात चुकीचे संदेश जातात,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी विचारले की, पुरुष कलाकारही अनेक कार्यक्रमांत सहभागी होतात, पण त्यांना का लक्ष्य केले जात नाही? “मी एका पुरस्कार समारंभासाठी परळीत गेले होते. कलाकार म्हणून माझी अनेक ठिकाणी प्रवासाची जबाबदारी असते. मग फक्त महिला कलाकारांवरच का निशाणा साधला जातो?” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
माळींनी सोशल मीडियावर तिच्या नावाशी जोडल्या गेलेल्या फेक व्हिडिओ आणि अफवांवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. “महिला कलाकारांची प्रतिमा विनाकारण डागाळली जाते. त्यांची शांतता ही कमजोरी मानली जाते, हे खूप चुकीचे आहे,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी हीही कबुली दिली की, सोशल मीडियावर पसरलेल्या नकारात्मकतेमुळे तिचे कुटुंबीय आणि मित्र चिंतेत होते.
माळींनी भाजप आमदार सुरेश धस यांना थेट इशारा दिला की, त्यांनी आपल्या वक्तव्यांसाठी सार्वजनिकपणे माफी मागावी. तसेच, त्यांनी याविरुद्ध कायदेशीर कारवाईचा विचार सुरू केल्याचेही सांगितले.
“महिला कलाकारांना टीआरपीसाठी गैरवापर करू नका”
माध्यमांना सल्ला देताना प्राजक्ता माळींनी म्हटले की, “महिला कलाकारांचा टीआरपीसाठी गैरवापर थांबवला गेला पाहिजे. अशा चुकीच्या आरोपांमुळे कलाकार नैराश्यात जाऊ शकतात, आणि कधी कधी त्यांना गंभीर पावले उचलावी लागतात.” त्या म्हणाल्या की, कलाकार समाजात आनंद पसरवण्यासाठी मेहनत घेत असतात, मात्र त्यांना वादग्रस्त प्रकरणांत ओढल्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
माळींनी आणखी विचारले की, “तुमच्या टीआरपीसाठी तुम्ही कलाकार महिलांना कुठल्या स्तरावर नेणार? आज तुम्ही अफवा पसरवता, उद्या कोणी या मानसिक त्रासामुळे आत्महत्येचा विचार करू शकते. त्यामुळे अशा गोष्टी तातडीने थांबल्या पाहिजेत.”
धनंजय मुंडे आणि प्राजक्ता माळी यांचं नाव एकत्र का येतं?
याआधीही सोशल मीडियावर धनंजय मुंडे आणि प्राजक्ता माळी यांच्या नात्याबाबत चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. याचं कारण ठरलं होतं, करुणा शर्मा यांचा एक व्हायरल व्हिडिओ, ज्यामध्ये त्यांनी धनंजय मुंडेंवर आणि काही कलाकारांवर गंभीर आरोप केले होते.
शर्मा यांच्या व्हिडिओनंतरच प्राजक्ता माळी आणि मुंडे यांचं नाव सोशल मीडियावर चर्चेत आलं होतं. हा वाद निवळायच्या आधीच, धस यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा या विषयानं चर्चेत झळक घेतली आहे.
सरपंच हत्या प्रकरणाचा संबंध याच घडामोडींशी आहे का?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नेमका काय संबंध आहे? बीड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला आहे. मात्र, धस यांच्या वक्तव्यामुळे हा विषय आता थेट धनंजय मुंडेंच्या खाजगी आयुष्यापर्यंत पोहोचला आहे.
मंडळी, तुम्हाला काय वाटतं? राजकारणात अशा वैयक्तिक आरोपांना कितपत जागा असावी? सुरेश धस यांचं वक्तव्य योग्य होतं का? प्राजक्ता माळीच्या नावाचा वापर होणं, आणि त्यावरून महिला आयोगात जाण्याचा निर्णय घेणं—या सगळ्यावर तुम्ही काय विचार करता?
One thought on “Prajakta Mali News : Dhananjay Munde आणि प्राजक्ता माळीचा नेमका विषय काय? Suresh Dhas असं का बोलले?”