महाराष्ट्रात सरासरी पगार आणि SIP द्वारे यशस्वी गुंतवणूक: कमी पगारातही संपत्ती निर्माण करण्याचे तंत्र
महाराष्ट्रातील सरासरी पगार
नमस्कार मित्रांनो! , स्वागत आहे तुमचे कोथरूडकर.कॉम या वेबसाईट वरती , आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत महाराष्ट्रातील सरासरी पगार आणि SIP (Systematic Investment Plan) च्या माध्यमातून संपत्ती कशी निर्माण करता येईल.
एक सर्वेक्षण असं दाखवतं की महाराष्ट्रात सरासरी पगार १२,००० ते १६,००० रुपये आहे. काही ठिकाणी हा पगार १०,००० ते १२,००० रुपये इतकाच आहे. आता, प्रश्न असा की कमी पगारात SIP सुरू करणं शक्य आहे का? आणि जर शक्य असेल, तर कसं?
आज आपण फक्त २००० रुपयांच्या SIP गुंतवणुकीचा विचार करून हे गणित सोपं करून घेऊयात. त्यासाठी, SIP म्हणजे काय, त्याचे फायदे काय, आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून त्याचा कसा फायदा होतो, हे पाहू.
SIP म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायचं तर SIP म्हणजे एखाद्या योजनेत नियमितपणे ठराविक रक्कम गुंतवणं. ही गुंतवणूक मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक पद्धतीने केली जाऊ शकते. याचा खास फायदा म्हणजे चक्रवाढ व्याज. म्हणजे काय? गुंतवलेली रक्कम फक्त वाढत नाही, तर त्यावर मिळालेलं व्याजही पुढच्या गुंतवणुकीत जोडलं जातं.
थोडक्यात सांगायचं तर, SIP म्हणजे “थोडं थोडं करून मोठं काहीतरी कमवण्याचा मार्ग”.
SIP मधून तुम्ही किती कमवू शकता?
तुम्ही दर महिन्याला फक्त २,००० रुपये SIP मध्ये गुंतवणूक केली तर काळाच्या ओघात ती रक्कम किती मोठी होऊ शकते, हे समजून घेऊया: सरासरी परतावा (12%)
खाली दिलेल्या रकमा ह्या सरासरी आहेत त्या बदलू शकतात ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी !
SIP Calculator :
जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकी नूसार किती परतावा मिळेल हे मोजायचे असेल तर ह्या लिंक वरुण मोजू शकता : https://groww.in/calculators/sip-calculator
1)५ वर्षांसाठी SIP:
जर आपण दर महिन्याला 2,000 रुपये SIP मध्ये गुंतवले आणि सरासरी 12% वार्षिक परतावा (CAGR) मिळाला, तर 5 वर्षात एकूण गुंतवणूक 1,20,000 रुपये होईल. या गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याजामुळे आपले एकूण मूल्यांकन 1,62,378 रुपये होईल.
- एकूण गुंतवणूक: ₹1,20,000
- सरासरी परतावा (12%): ₹1,62,378
- नफा: ₹42,378
2) १० वर्षांसाठी SIP:
जर आपण SIP 10 वर्षांसाठी चालू ठेवली तर आपली एकूण गुंतवणूक 2,40,000 रुपये होईल. मात्र चक्रवाढ व्याजामुळे एकूण मूल्यांकन 4,48,545 रुपये होईल.
- एकूण गुंतवणूक: ₹2,40,000
- चक्रवाढ मूल्यांकन: ₹4,48,545
- नफा: ₹2,08,545
3) १५ वर्षांसाठी SIP:
15 वर्षांच्या SIP गुंतवणुकीत, 3,60,000 रुपये गुंतवलेले असताना, एकूण मूल्यांकन 9,52,000 रुपये होईल, ज्यात आपले प्रॉफिट जवळपास 5,92,000 रुपये असेल.
- एकूण गुंतवणूक: ₹3,60,000
- चक्रवाढ मूल्यांकन: ₹9,52,000
- नफा: ₹5,92,000
4) २० वर्षांसाठी SIP:
20 वर्षांनंतर आपण 4,80,000 रुपये गुंतवून 18,41,000 रुपये मिळवू शकता. यामध्ये आपल्या गुंतवणुकीवर 13,61,000 रुपये लाभ मिळतो.
- एकूण गुंतवणूक: ₹4,80,000
- चक्रवाढ मूल्यांकन: ₹18,41,000
- नफा: ₹13,61,000
5) २५ वर्षांसाठी SIP:
जर आपण SIP 25 वर्षांसाठी सुरू ठेवली तर 6,00,000 रुपये गुंतवून आपल्याला सुमारे 34,00,000 रुपये मिळवता येतात, ज्यामध्ये 28,00,000 रुपयांचा प्रॉफिट आहे.
- एकूण गुंतवणूक: ₹6,00,000
- चक्रवाढ मूल्यांकन: ₹34,00,000
- नफा: ₹28,00,000
6) ३० वर्षांसाठी SIP:
SIP गुंतवणूक 30 वर्षांसाठी केली तर 7,20,000 रुपये भरणे होते. पण 12% सरासरी परतावा मिळाल्यास एकूण मूल्यांकन 61,38,463 रुपये होते, ज्यात प्रॉफिट 54,00,000 रुपयांच्या आसपास आहे.
- एकूण गुंतवणूक: ₹7,20,000
- चक्रवाढ मूल्यांकन: ₹61,38,463
- नफा: ₹54,18,463
थोडक्यात: थोड्या रकमेने सुरू करा, पण संयम ठेवा. दीर्घकाळासाठी SIP करणं फायदेशीर ठरतं.
कमी पगारात SIP कसं फायदेशीर ठरू शकतं?
जर तुमचा पगार मर्यादित असेल, तरी SIP तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. कसं?
- लहान सुरुवात करा: SIP ची किमान रक्कम कमी ठेवून सुरुवात करा, जसे की ५०० रुपये किंवा २००० रुपये.
- चक्रवाढ व्याजावर भर द्या: गुंतवणुकीचा काळ जास्त ठेवल्यास व्याजावर व्याज मिळत राहील.
- प्राधान्य ठरवा: तुम्हाला कोणत्या टप्प्यावर किती परतावा हवा, हे ठरवा. उदा. मुलांचं शिक्षण, स्वतःचं घर, किंवा निवृत्ती यांसाठी टप्पे आखा.
SIP मध्ये गुंतवणुकीपूर्वी हे लक्षात ठेवा
1) तज्ज्ञांचा सल्ला घ्या: SIP सुरू करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराशी बोलणं फायद्याचं ठरतं. त्यांनी दिलेली योग्य योजना तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचवेल.
२)जोखीम समजून घ्या: SIP मधील गुंतवणूक चांगला परतावा देते, पण बाजार जोखमींमुळे परतावा निश्चित नसतो.
३) दीर्घकालीन योजना ठेवा: चक्रवाढ व्याजाचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा असेल तर गुंतवणूक दीर्घकाळासाठी सुरू ठेवा.
थोडक्यात सांगायचं तर, SIP म्हणजे “थोड्या पगारातही मोठं स्वप्न साकार करण्याचं साधन.” तुम्हाला फक्त संयम ठेवावा लागेल आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करावं लागेल.
एक छोटी रक्कम SIP मध्ये गुंतवा, आणि ती दीर्घकाळासाठी सुरू ठेवा. चक्रवाढ व्याजामुळे गुंतवणुकीचा परतावा मोठ्या प्रमाणावर वाढतो, आणि तुम्हाला आर्थिक स्थैर्य देतो.
टिप: जर हा ब्लॉग तुमच्या उपयोगाचा वाटला, तर आवर्जून तुमच्या मित्र-परिवाराशी शेअर करा, आणि नवीन माहितीसाठी आम्हाला इंस्टाग्राम, व्हाट्सअप वरती फॉलो करा!
5 thoughts on “2000 ची SIP करा आणि मिळवा 3.18 crore लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये ”