OTT Diwali Week New Movies & Web series october: या आठवड्यातील धमाकेदार OTT रिलीजेस आणि नवीन सिनेमे: जोकरचा सीक्वल, मित्या: द डार्कर चॅप्टर, भूल भुलैया ३ आणि बरेच काही!
नमस्कार मित्रानो! स्वागत आहे आपल्या कोथरुडकर.कॉम च्या वेबसाईट वर .आज आपण या आठवड्यातील धमाकेदार OTT रिलीजेस आणि नवीन सिनेमे या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत , मग तयार ना मनोरंजनाचा आस्वाद घ्यायला?
आता या आठवड्यामध्ये दिवाळीचा सण आला आहे, आणि यावेळी मनोरंजनाचा जल्लोष आणखी वाढणार आहे. या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्म्सवर आणि थेटरमध्ये भरपूर धमाका पाहायला मिळणार आहे. नवीन थ्रिलर, कॉमेडी, ड्रामा, आणि रहस्य कंटेंट सर्व काही एकाच ठिकाणी येत आहे. Netflix, Amazon Prime Video, Disney+ Hotstar, ZEE5 आणि अन्य OTT प्लॅटफॉर्म्सवर कोणकोणते शो आणि सिनेमे येत आहेत हे जाणून घेऊ या!
Netflix – OTT Diwali Week New Movies & Web series october
नेटफिक्स धमाका आठवड्यामध्ये ओटीटी वरती दोन वेब सिरीज व एक सिनेमा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्याच्या त्याला रहस्य थ्रीलर मूव्हीज वेब सिरीज बघण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हा आठवडा मनोरंजनाची परवणी देणार ठरणार आहे.
1.The Law According to Lidia Poët (सीझन २) (ऑक्टोबर ३०): या सीजन मध्ये आपल्याला इटलीच्या पहिल्या महिला वकिल लिडिया पोएटच्या संघर्षमय प्रवासाची गूढकथा तसेच, जिथे लिडिया पोएटला कशे समाजातील अन्यायाशी दोन हात करावे लागतात हे पाहायला मिळणार आहे.
2.Time Cut (ऑक्टोबर ३०): टाईम टाईम कट यामुळे सिनेमांमध्ये ,एक कॉलेज मधील मुलगी भूतकाळामध्ये चुकून प्रवास करते, व तिच्या बहिणीला बहिणीला व तिच्यासोबत झालेल्या त्यामध्ये काही मुलांना वाचवण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करते ते आपण या सिनेमांमध्ये पाहणार आहोत. हा सिनेमा खूप रहस्य आणि थ्रील या दोन्हींचे मिश्रण असलेला हा चित्रपट नक्कीच तुमचा नजर हटू देणार नाही.
3.The Diplomat (सीझन २) (ऑक्टोबर ३१): नेटफ्लिक्सच्या या हिट पॉलिटिकल थ्रिलरमध्ये, अमेरिकेची राजदूत केट वायलर (केरी रसेल) लंडनमध्ये एका संकटाचा सामना करताना तिच्या महत्त्वाकांक्षी पतीसोबतच्या नात्याचे ताण तणाव हाताळते. यावेळी, गुप्तपणे केटला अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदासाठीही तयार केले जात आहे. पहिल्या सीझनच्या शेवटी लंडनमधील कार स्फोटामुळे केटच्या पतीला धोका निर्माण झाला आहे का, हे उलगडण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
Disney+ Hotstar– OTT Diwali Week New Movies & Web series october
1.Wizards Beyond Waverly Place (ऑक्टोबर ३१): Wizards Beyond Waverly Place ही एक आगामी अमेरिकन कौटुंबिक आणि विनोदी मालिका आहे, जी Wizards of Waverly Place चा स्पिन-ऑफ आणि सिक्वेल आहे. 29 ऑक्टोबर 2024 रोजी डिस्ने + hostar वरती प्रीमियर होणार असलेल्या या मालिकेत डेव्हिड हेन्री जस्टिन रुसोच्या भूमिकेत दिसणार आहे, तर सेलेना गोमेझ ॲलेक्स रुसोच्या भूमिकेत पाहुण्या कलाकार म्हणून दिसणार आहे.
या कथेतील जादूई आणि विनोदी घटक प्रेक्षकांना पुन्हा आनंद घेत येइल .
2.Lubber Pandhu (नोव्हेंबर १): या चित्रपटात क्रिकेटची रंजक स्पर्धा पाहायला मिळते , जिथे गेथू आणि अनबूचे भिडणे मनोरंजक ठरते. खेळात सुरू झालेला तणाव वाढतो, जेव्हा अनबूला गेथूच्या मुलीवर प्रेम होऊ लागते आणि मग मैदानात आणि बाहेरही गोंधळ निर्माण होतो , या मूवी मध्ये सामाजिक प्रश्न आणि रोमांचक खेळाच्या मिश्रणामुळे ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ZEE5
Mithya: The Darker Chapter: ही एक मिस्ट्री सीरिज आहे ज्यात हुमा कुरेशी आणि अवंतिका दासानी मुख्य भूमिकेत आहेत. रोहन सिप्पी दिग्दर्शित ही सीरिज नोव्हेंबर 2024 मध्ये ओटीटीवर रिलीज होणार आहे.जेव्हा भूतकाळातील गुपितं वर्तमानात उलगडत जातात, तेव्हा काय होतं? जुहीला याचा अनुभव लवकरच येणार आहे.
थिएटर रिलीजेस – OTT Diwali Week New Movies & Web series october
1.Amaran: तमिळ बायोपिक ज्यात मेजर मुकुंद वरदराजन यांची जीवनगाथा 2014 मध्ये काश्मीरमधील शोपियानमध्ये झालेल्या काझीपथरी ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवर आधारित ही कथा मेजर मुकुंद वरदराजन यांच्या साहसी आणि प्रेरणादायी प्रवासाची आहे. या बायोग्राफी, ड्रामा, आणि युद्धकथेत त्यांच्या शौर्यपूर्ण लढाईचे, बलिदानाचे आणि कर्तव्याप्रती समर्पणाचे रोमांचक दर्शन होते. काझीपथरीच्या संघर्षातून देशासाठी त्यांचे धैर्य आणि त्याग हे त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनले.
2.Lucky Baskhar: तेलुगु क्राईम थ्रिलर, ज्यात एका कॅशियरची रोमांचक कथा पाहायला मिळेल.
3.Bhool Bhulaiyaa 3: चित्रपटाचा तिसरा भाग येत असून, त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये कार्तिक आर्यनबरोबर विद्या बालनचीही झलक दिसत आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. हॅलोविनला घाबरण्याची तयारी ठेवा!
4.Singham Again: रोहित शेट्टीचा जबरदस्त ऍक्शन थ्रिलर, ज्यात अजय देवगण पुन्हा बाजीराव सिंगम बनून मोठ्या मिशनवर निघतो. सलमान खानचा कैमियो आणि कार्तिक आर्यनचा दमदार परफॉर्मन्स यामुळे सिनेमा अनोखा ठरणार आहे.
Amazon Prime Video – OTT Diwali Week New Movies & Web series october
1.Somebody Somewhere (ऑक्टोबर २९): ही एक मध्यमवयीन महिलेची कथा आहे जी आयुष्यातील संकटांना सामोरे जात असताना ती नाव नवीन मार्ग शोधत असते. भावनिक आणि विचारप्रवृत्त करणारा असा हा अनुभव आहे.
2.Joker: Folie à Deux (ऑक्टोबर ३०): बहुप्रतिक्षित असणारा असा जोकर चा दुसरा भाग, ज्यात जोकरच्या जीवनातील नवा अध्याय उलगडतो. या सीक्वलमध्ये आर्थर फ्लेक आणि हार्ली क्विन यांच्या नात्यातील जटिलता आणि म्ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे चित्रपटाचं वेगळेपण उभरून येईल.
परंतु या चित्रपटाला जोकर या सिनेमा सारखा प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा सिनेमा ओटीपी वरती प्रदर्शित करण्यात आलेला आहे.
सध्या सिनेमा अमेझॉन प्राईम व्हिडिओ वरती पाहण्यासाठी उपलब्ध आहे .
दिवाळीच्या सना मध्ये आणि उत्साहात नव नविन कंटेंट पाहण्याची तयारी करा, मित्रांनो!
आणि आपला हा ब्लॉग कसा वाटला ही कमेन्ट सेक्शन मध्ये नक्की सांगा , आजून तुम्हाला कोणत्या विषयावरती माहिती वाचायला आवडेल , हे पण नक्की सांगा .व नवीन अपडेटस मिळवण्यासाथी आपल्या whatsapp ,telegram ग्रुप्स ला जॉइन करा . धन्यवाद !
4 thoughts on “या दिवाळी मध्ये OTT वर काय पाहाल | OTT Diwali Week New Movies & Web series october”