New 4 Vande Bharat Trains will be launched from Pune : सर्व पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे! लवकरच पुण्यातून चार नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहेत. वंदे भारत ट्रेन हि त्त्यांच्या वेग आणि कार्यक्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या भारतीय ट्रेनने राज्यभरातील प्रवासाचा वेळ काही तासावरून ते काही मिनिटानमधे कमी केला आहे. अलीकडेच पुण्यातून दोन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू झाल्या आहेत.
कोणत्या मार्गावरून वंदे भारत ट्रेन उपलब्ध होणार आहे : New 4 Vande Bharat Trains will be launched from Pune
- पुणे ते कोल्हापूर
- पुणे ते हुबळी आणि
- मुंबई ते सोलापूर
या मार्गांवर सेवा उपलब्ध आहेत, ज्या सर्व पुण्यातून जातात. आता आणखी मार्ग जोडले जातील, ज्यामुळे शहरातील रहिवाशांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होईल.
वंदे भारत ट्रेन आगामी काळामध्ये कोणत्या मार्गांमधून धावेल | New 4 Vande Bharat Trains will be launched from Pune
- पुणे ते शेगाव
- पुणे ते बडोदा
- पुणे ते सिकंदराबाद आणि
- पुणे ते बेळगाव
यांचा समावेश आहे. या नवीन मार्ग जोडण्या मुळे प्रवास अधिक सुलभ होईल, प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचेल.
हे आहेत वंदे भारत ट्रेन चे तिकीट दर:
- पुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेससाठी प्रवाशांना प्रति तिकीट ₹560 आकारले जातात. याशिवाय,
- कार्यकारी वर्गात 52 आसने उपलब्ध आहेत, जिथे तिकीट दर ₹1,135 पर्यंत जाऊ शकतात.
आठवड्यातून या दिवशी चालणार पुणे ते कोल्हापूर एक्सप्रेस:
- बुधवार
- शुक्रवार
- रविवार
तूर्तास तरी फक्त ह्याचा दिवशी हे एक्सप्रेस चालेल अशी माहिती मिळाली आहे.वंदे भारत ट्रेन ह्या देशभरात त्यांच्या वेगासाठी ओळखल्या जातात, आणि आता त्या वेगाने राज्यभर पसरत आहेत, ज्यामुळे प्रवास जलद, सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम होत आहे.
पुणे ते हुबळी मार्गा वरील प्रवाशांचा वाचणार 3 तास वेळ :
सध्या, पुणे ते हुबळी वंदे भारत एक्सप्रेस 557 किलोमीटर अंतर कापते, ज्यासाठी सुमारे आठ तास लागतात. इतर ट्रेनच्या तुलनेत, ही सेवा प्रवाशांचा जवळपास तीन तासांचा प्रवास वेळ वाचवते.
पुणेकर व बाकी सर्व प्रवाशांसाठी हि एक दिवाळी पूर्वी मिळालेली आनंददायी बातमी आहे
2 thoughts on “New 4 Vande Bharat Trains will be launched from Pune – जाणून घ्या कोणते आहेत नवीन मार्ग”