maharastra vidha sabha election: महाराष्ट्र हे अत्यंत महत्वाचे व आर्थिकदृष्ट्या प्रभावशाली असे राज्य आहे. यामुळेच महाराष्ट्र
विधानसभेच्या निवडणुका राष्ट्रीय राजकारणात महत्वपूर्ण ठरतात. आता येणाऱ्या २०२४ महाराष्ट्र
निवडणुकीला लवकरच सुरुवात होणार आहे आणि यावेळी याचे विशेष महत्व आहे. यावेळी बदलती
समीकरणे, राजकीय घडामोडी, पक्षात झालेल्या उलथापालथी याचा मोठा प्रभाव निवडणुकीत पाहायला
मिळेल. यासाठी सर्व पक्षांनी आपापल्या विजयासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मंतदानाची प्रकिर्या होईल आणि २३ नोव्हेंबरला मत मोजणी असेल
महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांची तयारी:| maharastra vidha sabha election
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना(ठाकरे गट), शिवसेना(शिंदे गट), भारतीय
जनता पक्ष (भाजप) व इतर विविध स्थानिक पक्षांमद्ये मतदान होणार आहे. कोणाचे मुद्दे जनतेला
पटतील,कोणाची रणनीती प्रभावी ठरेल हे लवकरच समजेल.
भारतीय जनता पक्ष (भाजप):
महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजप आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या
नेतृत्वाखाली सध्या महाराष्ट्रात हा पक्ष काम करत आहे. मागील २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत
भाजपा ला खूप चांगले यश मिळाले होते. भारताचे प्रधानमंत्री मा.श्री नरेंद्र मोदी यांनी खूप महत्त्वपूर्ण
निर्णय घेतले आहेत. पक्षाचा मुख्य फोकस हा त्यांनी केलेली कामे आणि घेतलेले महत्वपूर्ण निर्णय
मतदारांपर्यंत पोहचवणे हा असेल.
शिवसेना (शिंदे गट) आणि (उद्धव ठाकरे गट):
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षात फूट पडली आणि त्यातूनच २ शिवसेना पक्ष
झाले.शिवसेना आणि भाजप ह्या पक्षाचे जुने नाते होते परंतु २०१९ साली उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत
असलेले जुने नाते तोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांसोबत सरकार स्थापन केले आणि महविकास
आघाडी ची उत्पत्ती झाली. नंतरी काही काळाने २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना
गटातील अनेक मोठ्या नेत्यांनी बंड केला यामुळे शिवसेनेचे २ गट पडले.
यामुळे २०२४ च्या निवडणुकीत ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात अत्यंत तीव्र लढत होऊ शकते.परंतु शिंदे
गटासोबत भाजप पक्ष असल्यामुळे त्यांना फायदा होऊ शकतो आणि लाडकी बहीण योजना आणि अनेकयोजना सुरू केल्यामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणात मत भेटण्याची शक्यता आहे. याचबरोबर उद्धव ठाकरे गट
हा जनतेच्या सहानभुती व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर निष्ठा राखण्यावर भर देईल.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस: |maharastra vidha sabha election
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीतील महत्वाचे पक्ष आहेत. २०२३ साली राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षात फूट पडली आणि अजित पवार व सोबत प्रमुख नेते हे भाजपा सोबत येऊन युती केली याचा
थोड्या प्रमाणात फटका हा पक्षाला मतदानाअंतर्गत बसू शकतो.
काँग्रेस हा पक्ष सुद्धा निवडणुकी साठी मैदानात उतरले आहेत. काँग्रेस हा फार पूर्वी पासून महाराष्ट्रातील
एक मजबूत पक्ष म्हणून ओळखला जायचा. पण भाजप आणि शिवसेनेच्या आघाडीने त्यांच्यावर मोठा
दबाव आणला.
स्थानिक मुद्दे आणि निवडणुकीतील भूमिका:
या निवडणुकीत स्थानिक प्रश्न यांना अत्यंत महत्व असेल. शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षण व्यवस्था, पाणीटंचाई,
दुष्काळग्रस्त भाग, आरोग्य सेवा या मुद्यांचा निवडणुकीवर परिणाम होईल.
आर्थिक विकास आणि रोजगार:
बेरोजगारी ही खूप मोठी समस्या आहे.महाराष्ट्र हे भारतातील सर्वात विकसित राज्यांपैकी जरी असले तरीही
बेरोजगारी यावर काम करणे आवश्यक आहे. मोठे शहर आणि ग्रामीण भागातील विकास यामधील तफावत
कमी करणे ही एक मोठी बाब आहे. नवीन उद्योगधंद्यांना चालना आणि रोजगार निर्मिती हे मुद्दे
महत्त्वाचे ठरतील.
शेतकऱ्यांचे प्रश्न:
भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे यामुळेच शेतकऱ्यांचे प्रश्न ही
निवडणुकीतील महत्वाची बाब असेल. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतीसाठी लागणाऱ्या इतर साधनाच्या
उपलब्धतेवर कर कमी करणे यावर पक्षांचे लक्ष असेल. शेतकऱ्यांचे मत हे सर्व पक्षांसाठी विशेष महत्वपूर्ण
असेल त्यासाठी पक्षांनी विशेष योजना जाहीर केल्या आहेत.
पायाभूत सुविधा आणि शहरीकरण:
मुंबई, नागपूर,पुणे यांसारख्या शहरांमध्ये शहरीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतु यामुळे
प्रदूषण,वाहतूक कोंडी यांसारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर कोणता पक्ष कशी भूमिका
मांडतो आणि काय उपाययोजना करतो यावर मतदाराचे लक्ष असेल. स्मार्ट सिटी आणि मुंबई मेट्रो
प्रकल्पात पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा या निवडणुकीत महत्त्वाच्या ठरतील.
राजकीय रणनीती:
आता येणाऱ्या २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपली स्वतंत्र रणनीती आखत
आहे. याचबरोबर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) सोबतच सत्तेचा प्रयत्न करतील. ठाकरे गट,काँग्रेस
आणि शरद पवार गट हे भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न करतील. या निवडूकीपूर्वी राजकीय घडामोडी
मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
डिजिटल प्रचार:|maharastra vidha sabha election
ह्या आधुनिक युगात डिजिटल प्रचाराला विशेष महत्त्व असेल.आजची युवा पिढी हे सोशल मीडिया वर जास्त
ॲक्टिव असतात आणि युवा मतदारांचे मत हे मतदानासाठी अत्यंत महत्वाचे असते. महाराष्ट्रातील
तरुणांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडिया हे महत्वाचे साधन आहे.
महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांचा प्रभाव:
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ही ही राजकारणावर मोठा प्रभाव पडणार आहे. शिवसेना पक्षातील
फूट, राष्ट्रवादी काँग्रेस मधील बंड यामुळे निवडणुकीत अत्यंत रंगत येणार आहे. स्थानिक मुद्दे,शेतकऱ्यांचे
प्रश्न हे महत्वाचे मुद्दे असतील.
आता येणारी २०२४ ची विधानसभा निवडणूक हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक महत्वाचा आणि
निर्णायक क्षण असेल.