Hot picnic spots to visit in winter season | विंटर सीजन मध्ये भेट द्यावेत असे हटके पिकनिक स्पॉट्स.

WhatsApp Channel Follow Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Follow Now

Hot picnic spots to visit in winter season: पावसाळा संपला की हिवाळ्याची चाहूल लागते.. ऑक्टोबरच्या उष्णतेनंतर हिवाळ्याची थंड आणि अल्हाददायक हवा , थंडी कमी व्हावी म्हणून शेकोटी भोवती बसून उबदार शेकोटीची मजा घेणे आणि मग थंडी नंतर सकाळी पाडणारे कोवळे ऊन या सगळ्यामुळे हिवाळा आपल्या सगळ्यांना च आवडतो. हिवाळ्यातल्या अशा रम्य वातावरणात मित्रमंडळींसोबत किंवा फॅमिली सोबत पिकनिक ला जावं असं सगळ्यांना वाटतं.. तुमचा ही या वर्षी पिकनिक ला जायचा plan असेल तर आम्ही सांगणार आहोत काही पिकनिक स्पॉटस् जे तुमच्या विंटर होलिडेज ला अविस्मरणीय बनवतील ..


1)हृषिकेश, उत्तराखंड :- गंगा नदीच्या काठावर असलेलं हृषिकेश हे शहर धार्मिक वारसा लाभलेलं शहर आहे ज्याला ‘जगाची योग राजधानी’ असे ही म्हणले जाते. तुम्ही जर अध्यात्मिक असाल किंवा धार्मिक स्थळांना भेट देण्यास तुम्हाला आवडत असेल तर हृषिकेश येथे एकदा तरी आलेच पाहिजे.इथे अनेक छोटी अध्यात्मिक स्थळे आहेत तसेच या शहराला निसर्गाचं सौंदर्य ही लाभलेलं आहे . असे सुंदर, पवित्र आणि प्रसन्न ठिकाण अध्यात्मिक लोकांसाठी परवणी च आहे.तुम्हाला जर मनःशांती अनुभवायची असेल आणि दैवी अनुभूती घ्यायची असेल तर हृषिकेश ला या वर्षीची ट्रीप नक्की च प्लॅन करा.

2)गोकर्ण, कर्नाटक :- आपल्यापैकी अनेक जणांना पिकनिक साठी बीच वर जायला आवडतं. पण बीच म्हणलं की अनेक ठिकाणी लोकांची प्रचंड गर्दी असते पण बीच ची खरी मजा शांत आणि रम्य अशा वातावरणात येते. कर्नाटकातला गोकर्ण बीच हा असाच रम्य वातावरण असलेला बीच . इथे लोकांची जास्त वर्दळ नसल्याने शांत आणि निवांत क्षणांचा अनुभव घेता येतो.

3)पोनमुडी केरळ :- निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या पोनमुडी या ठिकाणाला केरळ मधील काश्मिर म्हणतात.इथले विदेशी फुलपाखरे, जंगली ऑर्किड, सकाळी पडणारे धुके रमणीय अनुभव देतात . ज्यांना ट्रेकिंग ची आवड आहे, त्यांच्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. कायम हिरवळीने सजलेल्या या हिल स्टेशन ला तुम्ही वर्षभरात कधी ही भेट दिली तरी तुमच्या साठी हा नेहमीच आनंददायी अनुभव असेल. तरीही नोव्हेंबर ते मार्च हा काळ पोन मुडी ला जाण्यासाठी सर्वाधिक चांगला असतो.
मीनमुट्टी धबधबा , पेप्पारा वन्यजीव अभयारण्य,मृग उद्यान व तेथील समृद्ध वनस्पती,प्राणी,कल्लार आणि गोल्डन व्हॅलीतील विहंगम दृश्य, चहाची बाग ही पोनमुडी मधील पाहण्यासारखी ठिकाणे .

4) इगतपुरी :- पश्र्चिम घाटातील सह्याद्री रांगांमधील इगतपुरी हे एक हिल स्टेशन. मनमोहक निसर्गाने समृद्ध अशा या इगतपुरी मध्ये तुम्ही वर्षभरात कधी ही, म्हणजे पावसाळ्या पासून ते हिवाळ्या पर्यंत कधी ही जाऊ शकता. किल्ले, धबधबे, पर्वत रांगा हे इगतपुरीचे वैशिष्ट्य. त्रिंगलवाडी किल्ला, विहिगाव धबधबा, कळसूबाई शिखर, विपश्यना केंद्र, भावली धरण, भातसा नदी चे खोरे, सांधण व्हॅली, कसारा घाट, म्यानमार गेट, कॅमेल व्हॅली, कुलंगगड किल्ला , बितन गड, अमृतेश्वर मंदिर ही इगतपुरी येथील आकर्षणाची ठिकाणे. ज्यांना रोजच्या स्ट्रेस फुल लाईफ मधून एक सुट्टी हवी असेल किंवा ज्यांना मेडीटेशन
करायला आवडत असेल, छान निसर्गाचे फोटोज् काढायचे असतिल अशा सगळ्यांनी इथे आवर्जुन जावे. चित्रपटाच्या शूटिंग साठी ही सुंदर जागा आहे.

5)जैसलमेर:- जैसलमेर हे राजस्थान मधलं एक शहर ज्याला गोल्डन सिटी म्हणून सुद्धा ओळखले जाते. इतर वेळी उष्ण असलेले हे ठिकाण हिवाळ्यामधील अल्हाददायक थंडी मुळे या काळात फिरायला जाण्यास उत्तम ठरते. राणा जैसल ने पिवळ्या दगडाने बांधलेला हजारो वर्षांपूर्वीचा जैसलमेर चा किल्ला, पटवा बंधूंनी 1870 मध्ये बांधलेले पटवा हवेल्या म्हणजे च पाच हवेल्या ,कोरीव बांधणीसाठी प्रसिद्ध आहेत. सलीम सिंग की हवेली , राजा रावल जैसल याने बांधलेला गडीसर तलाव, बडा बाग, सेना संग्रहालय तसेच येथील वाळवंट हे जैसलमेर ची प्रमुख आकर्षणाची ठिकाणे.

6) दार्जिलिंग:- दार्जिलिंग हे भारताच्या पश्र्चिम बंगाल मधिल एक शहर. हिमालयाच्या पायथ्याशी असलेलं हे एक लोकप्रिय हिल स्टेशन. हिवाळ्याच्या सीझन मध्ये बर्फाच्छादित पर्वतांच दृश्य अतिशय मनमोहक वाटते. हिवाळ्यामध्ये इथे लोकांची गर्दी कमी असते, त्यामूळे तुम्हाला जर एकांत एन्जॉय करायचा असेल तर हिवाळ्यामध्ये दार्जिलिंग ला जायचा प्लॅन नक्की बनवा.हिल स्टेशन्स ची क्वीन बर्फाने आच्छादलेली  कांचनजंगा, डोंगर उतारावरून वाहत येणारे मुसळधार पाणी,
चहाच्या सुंदर बागा, फर्न्स, पाइन्स आणि फर्नसह लँडस्केप दार्जीलिंग चे नैसर्गिक सौंदर्य वाढवते. 1,200 स्क्वेअर फीट इतके व्यापलेले, हिमालयाच्या शिखरांनी नटलेले आणि त्यात सुंदर हिरव्यागार चहाच्या मळे, यामुळे दार्जीलिंग चे सौंदर्य आणखीन वाढवते.दार्जिलिंगचे नाव ‘दोरजी’ या तिबेटियन शब्दावरून ठेवले गेले आहे. दोरजी चा अर्थ ‘थंडरबोल्ट’ आणि ‘लिंग’ शब्दाचा अर्थ ‘स्थान’ असा आहे.त्यामुळे दार्जिलिंगचा शब्दशः अर्थ घ्यायचा झाल्यास ‘विजांचे ठिकाण’ असा घेता येऊ शकतो.

जाणून घ्या कोणते आहेत नवीन मार्ग

Spread the love

Leave a Comment