Hitesh Doshi’s Inspiring Journey in Renewable Energy: हितेश दोशी यांचा प्रेरणादायी प्रवास: ₹5,000 पासून ₹43,700 कोटींच्या साम्राज्यापर्यंत
पाच हजार रुपये पासून केली उद्योगाची सुरुवात!
हितेश चिमनलाल दोशी यांची व्यावसायिक वाटचाल ही खरोखरच उद्योगांमध्ये उतरू पाहणाऱ्या युवक वर्गासाठी प्रेरणादायी ठरत आहे. हितेश यांनी 1985 मध्ये फक्त ₹5,000 नातेवाईकांकडून घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा हा प्रवास खूपच खडतर व कष्टाचा आहे. फक्त १२वी शिकलेले हितेश, शिकत असतानाच व्यवसाय सुरू सुरू करण्याची त्यांची इच्छा यामुळे ते या व्यवसायात उतरले, त्यांना या व्यवसायातून महिन्याला ₹1,000 मिळवत असताना त्यांनी कॉलेजची फी आणि रोजच्या गरजा भागवता भागवता या व्यवसायाची सुरुवात केला. अशा साध्या सुरुवातीपासून त्यांची जागतिक ऊर्जा क्षेत्रामध्ये ओळख निर्माण झाले आहे.
प्रारंभिक संघर्ष आणि मेहनत – स्वतःच्या पायावर उभे राहण्याची धडपड
कोणत्याही व्यवसाय असो व कामाची सुरुवात करताना ,माणसाला खडतर प्रयत्न व संघर्ष हा करावाच लागतो याचे उत्तम उदाहरण हे हितेश तो दोशी आहेत. सुरुवातीला हितेश यांनी गेजेस (मोजमाप करणारी उपकरणे) विक्री करून सुरुवात केली. एका छोट्या जागेतून व्यवसाय चालवताना प्रत्येक गोष्टीसाठी कष्ट घ्यावे लागले, मात्र त्यांचा चिकाटीने घेतलेला प्रत्येक प्रयत्न त्यांना पुढे घेऊन गेला. या काळात त्यांनी पाणी पंप, हीटर, कुकर सारख्या विविध उपकरणांची निर्मितीही सुरू केली. त्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या समर्थ बनवण्यासाठी या मार्गाने प्रगती केली. आणि आता त्यांचा हा प्रयत्न आपल्याला सत्यात उतरताना दिसत आहे.
पहिली कंपनी Waaree Instruments | Hitesh Doshi’s Inspiring Journey in Renewable Energy
1989 साली हितेश यांनी Waaree Instruments नावाने पहिली कंपनी स्थापन केली. या कंपनीने पहिल्याच वर्षी ₹12,000 ची उलाढाल केली. त्यांचा हा व्यवसाय लहान असला तरी,Waaree Instruments त्यांच्या पुढील यशाचा पाया ठरला. त्यांनी स्वतःवर असलेला विश्वास आणि मेहनतीने साधलेली यशस्वी वाट यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे कोणतीही साध्य करण्या साठी माणसाचा स्वतः वरती विश्वास आणि कष्ट करण्याची इच्छा असली पाहिजे . हे यांच्या कडून आपल्याला शिकायला मिळते.
ऊर्जा क्षेत्रात प्रवेश Waaree Energies ची स्थापना | Hitesh Doshi’s Inspiring Journey in Renewable Energy
हळूहळू व्यवसायात सुधारणा झाल्यानंतर, 2007 मध्ये, हितेश यांनी Waari मंदिरावरून प्रेरणा घेत “Waaree Energies” नावाने कंपनीची स्थापना केली.आणि सौर ऊर्जा क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी या क्षेत्रातील मोठ्या संधी ओळखून सौर ऊर्जा उपकरणांच्या निर्मितीला सुरुवात केली. त्यांच्या मेहनतीने आणि दूरदृष्टीने कंपनीने अमेरिकन आणि युरोपियन ग्राहकांची विश्वासार्हता मिळवली आणि त्यांचे ऑर्डर्ससुद्धा वाढू लागल्या.
IPO चे यश गुंतवणूकदारांना 66% पेक्षा जास्त परतावा | Hitesh Doshi’s Inspiring Journey in Renewable Energy
1 Waaree Renewable Technologies च्या IPO ने गुंतवणूकदारांना 66% पेक्षा अधिक परतावा दिला आहे. या IPO ची लिस्टिंग किंमत ₹2550 इतकी होती, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. च्या यशामुळे कंपनीचे मार्केट कॅपिटल ₹71,244 कोटींच्या वर पोहोचले, ज्यामुळे Waaree Energies ने भारतात एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
छोट्या खेड्यातून साकारलेले यशस्वी साम्राज्य :
हितेश दोशी हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्या खेड्यात जन्मलेले आहेत. त्यांचे वडील किराणा दुकान चालवायचे. त्यांच्या गावात फक्त ७वी पर्यंत शाळा होती. पुढील शिक्षणासाठी त्यांना गाव सोडून जावे लागले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईत येऊन Chinai College of Commerce and Economics मधून शिक्षण घेतले. शिक्षणाबरोबरच त्यांनी व्यवसाय उभारण्याचा ध्यास घेतला.
Waaree Energies ची यशस्वी यात्रा – नावापासून मंदिराचा सन्मान
हितेश यांनी आपली कंपनी ‘Waaree Energies’ असे नाव दिले, जे त्यांच्या गावी असलेल्या वाररी मंदिरावरून प्रेरित आहे. त्यांनी या नावामध्ये आपल्या मूळ गावाशी असलेले आपले प्रेम आणि श्रद्धा जपली आहे. आज हे नाव फक्त भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात ओळखले जाते, आणि कंपनी अक्षय ऊर्जा क्षेत्रातील एक सशक्त खेळाडू बनली आहे.
जगभरात श्रीमंतांच्या यादीत स्थान
Waaree Energies ची यशस्वी लिस्टिंग झाल्यानंतर हितेश दोशी आणि त्यांचे कुटुंब जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये सामील झाले आहेत. Bloomberg Billionaires Index नुसार, यामुळे त्यांच्या संपत्तीत जवळपास $5 बिलियन (₹50,000 कोटी) इतकी वाढ झाली आहे.
सामाजिक सुरक्षा आणि समाजहिताची जबाबदारी
हितेश दोशी यांचा प्रवास हा नवउद्योजकांसाठी एक प्रेरणादायी आहे. त्यांनी स्वतःच्या कष्टांनी मिळवलेल्या यशामुळे त्यांनी समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून विविध सामाजिक कार्यात सहभागी होण्यास सुरुवात केली आहे.आज Waaree Energies कंपनी गुणवत्ता आणि विस्तारावर लक्ष केंद्रित करत आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्रातील या प्रगतीला चालना देण्यासाठी त्यांनी नवीन तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम, आणि सर्वसमावेशकता यावर भर दिला आहे.
हितेश दोशी यांचा हा प्रवास कष्ट, दूरदृष्टी, आणि न संपणाऱ्या इच्छाशक्तीचा आदर्श दाखवतो. छोट्या सुरुवातीपासून ते आजच्या ऊर्जेच्या साम्राज्यापर्यंतचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, ज्यातून शिकून नवउद्योजक आपले ध्येय साध्य करू शकतात.