Santosh Deshmukh Murder Case : खंडणी वादाशी संबंधित, आरोपी वाल्मिक कराडला अटक होणार का?

WhatsApp Channel Follow Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Follow Now

Santosh Deshmukh Murder Case Update:बीड : जिल्ह्यातील मस्साजोग (Massajog) गावाच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या 9 डिसेंबर रोजी झालेल्या निर्घृण हत्येमुळे राज्यभर संतापाची आणि हळहळीची लाट उसळली आहे. या घटनेने केवळ मस्साजोगच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पवन चक्की प्रकल्पातून सुरू असलेल्या खंडणीच्या वादामागे ही घटना घडल्याचा पोलिसांच्या तपासात उलगडा झाला आहे. हत्येच्या क्रूरतेने सर्वसामान्य लोकांपासून ते राजकीय वर्तुळापर्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ह्या घटनेचा संपूर्ण आढावा आपण या बातमी मधून घेऊया .

Join Our whastapp group: Join Now

Table of Contents

सरपंच संतोष देशमुखांसोबत ‘त्या’ दीड तासांत काय घडलं? Beed Santosh Deshmukh Murder Case

संतोष देशमुख आणि त्यांचे आतेभाऊ एका चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे येत होते. डोणगावजवळ काही वाहनांनी अचानक त्यांची गाडी अडवली. दोन स्कॉर्पिओ गाड्या मागे आणि पुढे उभ्या करून त्यांच्या गाडीला थांबवण्यात आले. या अज्ञात व्यक्तींनी संतोष देशमुख यांना जबरदस्तीने बाहेर काढले.

एकदा गाडीबाहेर खेचल्यावर आरोपींनी लोखंडी पाईप, हॉकी स्टिक, रॉड आणि इतर हत्यारांनी त्यांच्यावर बेदम हल्ला केला. हा हल्ला इतका अमानुष होता की त्यांच्या शारीरिक अवस्थेची कल्पना देखील सुन्न करणारी आहे. त्यांच्या सोबत असलेल्या आतेभावाने याच वेळी जवळच्या पोलीस ठाण्याचा मार्ग धरला आणि मदतीची याचना केली. परंतु पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचले, ज्यामुळे संतोष देशमुख यांना आणखी अत्याचार सहन करावा लागला आणि त्यांचा मृत्यू झाला.

Santosh Deshmukh Murder Case update
Santosh Deshmukh Murder Case update

शवविच्छेदन अहवालातील धक्कादायक खुलासा (Postmortem Report Findings)

या घटनेनंतर संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन (Postmortem) अहवाल समोर आला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा मृत्यू ‘हॅमरेज टू मल्टिपल इन्जुरिज’ मुळे झाला.

  1. शारीरिक जखमा: देशमुख यांच्या शरीरावर 56 जखमा होत्या. बरगड्या तुटून आत गेल्या होत्या, ज्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाला.
  2. क्रूरता: इतकेच नाही, तर त्यांच्या डोळ्यांना जाळण्याचा प्रयत्न झाल्याचेही समोर आले आहे. मात्र, पाठीवर आणि शरीराच्या इतर भागावर झालेल्या जबर मारहाणीनेच त्यांचा मृत्यू झाला.
  3. आरोपींची हिंसा: आरोपींनी तब्बल दीड तास देशमुख यांना अमानुषपणे मारहाण केली होती.

आरोपीसोबत भावाचा व पोलिसांचा  VIDEO; आदल्यादिवशी हॉटेलात काय घडलं?

हत्येप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील (PSI) यांच्यावर कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. 8 डिसेंबरच्या संध्याकाळच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुदर्शन घुले (मुख्य आरोपी), राजेश पाटील आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यात चर्चा होत असल्याचे दिसते.

यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. या आरोपांमुळे राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आले असून, केस पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

Arrest warrant against cricketer Robin Uthappa : ₹24 लाख भरण्यासाठी, 27 डिसेंबरपर्यंतची मुदत

सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण :  खंडणी वादाशी संबंधित, वाल्मिक कराडला अटक होणार का?

वाल्मिक कराड हे बीड जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आणि वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असून सध्या ते संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी आणि गुन्हेगारी कारवायांमुळे चर्चेत आहेत. त्यांच्यावर केज तालुक्यातील आवादा एनर्जी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून खंडणी मागण्याचा गंभीर आरोप आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कलम 302 (हत्या), 364-A (अपहरण आणि खंडणी), 384 (खंडणी), 506 (जीवाला धोका देणे) आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई सुरू आहे.

तसेच, संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्या सहभागाच्या संशयामुळे त्यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. विरोधकांनी या प्रकरणात त्यांच्यावर थेट जबाबदारी ठेवली असून महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उचलला गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याचे आणि मकोकाच्या अंतर्गत कठोर कारवाई होण्याचे संकेत दिले आहेत. सध्या वाल्मिक कराड फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यांच्या या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे सामाजिक शांततेला धोका निर्माण झाला आहे.

( महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, 1999 या कायद्याला मकोका (MCOCA) असेही म्हणतात. हा कायदा राज्य सरकारला संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष अधिकार देतो)

Allu Arjun Residence Attack : पुष्पा २ च्या चेंगराचेंगरी प्रकरणातील वाढता वाद, चाहत्यांमध्ये संताप

आरोपींवर कायदेशीर कारवाईची प्रगती (Accused and Investigation Progress)

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सुदर्शन घुले (मुख्य आरोपी), प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम साठे, महेश केदार, आणि कृष्णा आंधळे या आरोपींचा समावेश आहे.

पोलिसांनी जयराम साठे, महेश केदार, प्रतीक घुले, आणि विष्णू साठे यांना अटक केली आहे. मात्र, मुख्य सूत्रधार सुदर्शन घुले अद्याप फरार आहे. पोलिसांना त्याचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहिम राबवावी लागत आहे. 

राजकीय वादळ: विधानसभेपासून जनतेपर्यंत संतापाचा उद्रेक (Political and Social Reactions)

संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळही तापले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्य आरोपींचे सत्ताधारी नेत्यांशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाच्या गांभीर्याची जाणीव ठेवून या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोपीचं एन्काऊंटर करणाऱ्याला 51 लाख रुपये आणि 5 एकर  जमिन बक्षीस

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील शेतकरी कल्याण बाबर यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीचा एन्काऊंटर करणाऱ्या किंवा आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तीसाठी 51 लाख रुपये रोख आणि 5 एकर जमीन देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेने संपूर्ण समाजातील संतापाची तीव्रता दाखवून दिली आहे.

गावकऱ्यांच्या भावना आता फक्त न्यायासाठीच नव्हे, तर कायदा व सुव्यवस्थेवर विश्वास टिकवण्याच्या मागणीसाठी आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे त्यांच्या कुटुंबाला अकल्पनीय वेदना सहन कराव्या लागत आहेत. त्यांच्या मागे त्यांची लहान मुले, पत्नी, आणि संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे.

गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलने केली असून, आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी मागणी केली आहे. त्यांच्या मते, अशा घटनांवर वेळेत कारवाई झाली नाही, तर समाजात गुन्हेगारांचे फावेल.

नेमकं काय घडलं? हत्येचा पूर्वसंधर्भ आणि तपशील

देशमुख व त्यांचा वाहनचालक मस्साजोगकडे जात होते. डोणगावजवळ दोन गाड्यांनी त्यांच्या वाहनाला अडवले. अज्ञात हल्लेखोरांनी देशमुख यांना गाडीबाहेर काढले आणि बेदम मारहाण केली.

मारहाणीच्या वेळी, आरोपींनी त्यांना जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसवले आणि त्यांना केजच्या दिशेने नेले. काही तासांनंतर, बोरगाव-दहीटना रस्त्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला.

समाजातील गंभीर विचार: अशा घटनांना आळा कसा घालायचा?

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर समाजात असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या प्रकरणातून समाजातील गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

  1. गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी कठोर शिक्षा: अशा क्रूर हत्याकांडांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते. गुन्हेगारांना वेळेत कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे.
  2. पोलीस आणि प्रशासनाची जबाबदारी: पोलिसांनी वेळेत कारवाई केली असती, तर संतोष देशमुख यांचे प्राण वाचले असते का, हा मोठा प्रश्न आहे.
  3. राजकीय हस्तक्षेपाची तपासणी: या प्रकरणातील आरोपींवर राजकीय दबाव आहे का, याची सखोल चौकशी आवश्यक आहे.

न्यायाची प्रतीक्षा: राजकीय खेळात खरंच न्याय मिळेल का ?

संतोष देशमुख यांची हत्या एका व्यक्तीची नाही, तर एका संपूर्ण समाजाची वेदना आहे. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळणे आणि या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा होणे, हेच सध्या जनतेचे मागणीचे केंद्रबिंदू आहे.

मुख्यमंत्री आणि सरकारने एसआयटी तपासाचे आदेश दिले असले तरी, या प्रकरणातील वेळेत न्याय मिळणे समाजासाठी नितांत गरजेचे आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि दोषींना फाशी देण्यासाठी स्थानिक प्रशासन, न्यायव्यवस्था, आणि पोलिसांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे.

Atul Subhash Suicide Case update: निकिताचे खळबळजनक खुलासे – जबरदस्तीने लग्न लावल्याचा दावा!

Spread the love

Leave a Comment