Atul Subhash Suicide Case update: निकिताचे खळबळजनक खुलासे
Atul Subhash Suicide Case update :मित्रांनो! AI इंजिनिअर अतुल सुभाष यांच्या आत्महत्या Atul Subhash suicide Case प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. जौनपूर कौटुंबिक न्यायालयात अतुल आणि त्यांची पत्नी निकिता यांनी दिलेल्या निवेदनांतून (statements )अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. निकिताने केलेल्या वक्तव्यानुसार, तिच्या पालकांनी जबरदस्तीने तिचे लग्न लावले, आणि त्यानंतर तिच्या सासरी तिचा छळ झाला. असल्याचे तिने सांगितले , यामुळे अतुल त्या सूइसाइड ला जबाबदार कोण यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे !
वडिलांच्या आजारपणाचा आधार घेत निकितावर दबाव | Nikita’s statement On Atul Subhash Case
निकिताने सांगितले की, तिच्या वडिलांना दहा वर्षांपासून हृदयविकाराचा त्रास होता आणि त्यांचे दिल्लीतील AIIMS रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या वडिलांच्या प्रकृतीचा आधार घेत तिच्या पालकांनी तिला लग्नासाठी तयार केले.निकिताने सांगितले की, “माझ्या वडिलांचे कारण देत , मला अतुलसोबत लग्न करण्यासाठी घरून भाग पाडण्यात आले.”
तिच्या म्हणण्यानुसार, ही पूर्णतः जबरदस्ती होती आणि तिच्या मनाविरुद्ध हे लग्न लावण्यात आले.
Pune News : कर्वे नगर शाळेत विद्यार्थ्यांवर अत्याचार; व्यवस्थापक आणि शिक्षक दोघे अटकेत
महागड्या लग्नाचा संपूर्ण खर्च अतुलवर | Atul Subhash Case update
26 जून 2019 रोजी अतुल आणि निकिताचे लग्न वाराणसीतील हॉटेल हिंदुस्तान इंटरनॅशनल येथे मोठ्या थाटामाटात पार पडले. या लग्नाचा पूर्ण खर्च अतुलने उचलला होता.
त्यानंतर नवविवाहित जोडप्याने मॉरिशसला हनीमूनसाठी प्रवास केला. हनीमूनचा संपूर्ण खर्चही अतुलनेच केला होता. लग्नामध्ये कोणतीही आर्थिक मदत निकिताच्या कुटुंबाकडून झाली नाही, असा दावा अतुलच्या कुटुंबीयांनी केला आहे.
निकिताने मात्र तिच्या निवेदनात सांगितले की, “मी लग्नात कधीच आनंदी नव्हते. माझं या नात्यात समाधानी राहणं कठीण झालं होतं.”
सासरच्या घरात छळ आणि आईचा हस्तक्षेप | Nikita’s Mother Responsible For this incident ?
निकिताने लग्नानंतरच्या घटनांवर गंभीर आरोप करत सांगितले की, सासरच्या घरात तिच्यावर मानसिक आणि भावनिक दबाव आणण्यात आला होता तसेच , तिने सांगितले की, तिच्या सासरच्या लोकांकडून तिला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यात येत असे .
यात भर म्हणजे तिच्या निवेदनानुसार, तिच्या आईनेही तिला सासरच्या लोकांविरोधात चिथावले, ज्यामुळे नातेसंबंध आणखीनच बिघडले. आईच्या या हस्तक्षेपामुळे तिच्या आणि अतुलच्या वैवाहिक आयुष्यात मोठे ताणतणाव निर्माण झाले.
अतुलच्या आत्महत्येभोवती प्रश्नचिन्ह? Nikita’s Mother Responsible For Atul Death!
निकिताच्या या खुलाशांमुळे अतुलच्या आत्महत्येच्या कारणांवर नवीन प्रश्न उभे राहिले आहेत. अतुलच्या मृत्यूपूर्वी घडलेल्या घटनांमध्ये निकिताच्या कुटुंबाचा सहभाग किती होता, यावर सध्या तपास सुरू आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, निकिताचे आरोप गंभीर असून, या प्रकरणातील प्रत्येक पैलूची सखोल चौकशी केली जात आहे.
या प्रकरणाने वैवाहिक नातेसंबंध आणि पालकांच्या हस्तक्षेपाचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. अतुलच्या आत्महत्येमुळे कुटुंबातील अपेक्षा, जबाबदाऱ्या आणि मानसिक दबावामुळे होणारे परिणाम स्पष्ट झाले आहेत.
तपास सुरू; सत्य समोर येण्याची शक्यता | Atul Subhash Suicide Case further investigation
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू केला असून, निकिताच्या निवेदनातल्या प्रत्येक गोष्टीवर चौकशी केली जात आहे. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, “अतुलच्या आत्महत्येसाठी नेमकी कोणती कारणं जबाबदार होती, याचा तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”
या प्रकरणाने समाजात लग्नाच्या जबाबदाऱ्यांचा ताण, कुटुंबीयांचा हस्तक्षेप, आणि वैवाहिक जीवनातील गुंतागुंतीवर नवी चर्चा निर्माण केली आहे.
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण हा वैवाहिक जीवनातील ताणतणाव आणि कुटुंबीयांच्या दबावाचा गंभीर परिणाम असल्याचे दिसून येते. या प्रकरणातून पुढील तपासात सत्य समोर येण्याची अपेक्षा आहे. वैवाहिक नात्यांमध्ये समतोल राखणे, भावनिक ओझं कमी करणे, आणि हस्तक्षेप कमी ठेवणे महत्त्वाचे ठरते. हे या घटनेतून दिसून येत आहे .
मित्रांनो , अशाच प्रकारच्या महत्वाच्या बातम्या मिळवण्या साठी तसेच खास पुण्यातील ठळक घडामोडी जाणून घेण्या साठी आमच्या सोबत कनेक्टेड रहा! व ही बातमी आपल्या मित्र परिवारा सोबत शेअर कराईला विसरू नका.
read also : Elli AvrRam debut in Marathi Cinema: ‘इलू इलू १९९८’ची गोड प्रेमकथा आणि तिचा हटके अंदाज ३१ जानेवारीला भेटीला!
Arrest warrant against cricketer Robin Uthappa : ₹24 लाख भरण्यासाठी, 27 डिसेंबरपर्यंतची मुदत