“पुण्याच्या शेफने रचला इतिहास: फक्त 1 रुपयांत ‘बटन पिझ्झा’!
World’s Smallest ‘Button Pizza’ Crafted by a Pune Chef:पिझ्झा खाण्याची क्रेझ कितीही असली तरी एका रुपयात पिझ्झा मिळतो, हे ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल. पण पुण्यातील शेफ सर्वेश जाधव यांनी हे शक्य करून दाखवलं आहे. त्यांच्या “बटन पिझ्झा” या आगळ्या-वेगळ्या संकल्पनेने जगभरात लोकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. आज आपण याच बटन पिझ्झा “Pune’s Button pizza” कसा सुरू झाला ? नेमका हा बटन पिझ्झा आहे तरी काय ?What is World’s Smallest ‘Button Pizza’ काय आहे यामागची स्टोरी? Emotional Story Behind “Pune’s Button pizza”आणि बटन पिझ्झा ने कोणता वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे ? World record Of “Pune’s Button pizza”या सर्व प्रश्नांची उत्तरे या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत.
असा झाला बटन पिझ्झाचा जन्म! Emotional Story Behind “Pune’s Button pizza”
Button Pizza By Chef Sarvesh | पुण्यातील शेफ सर्वेश ने बनवला अवघ्या एक रुपयाचा बटन पिझ्झा. सर्वेश जाधव हे पुण्यातील “रिका कॅफे“cafe rika pune button pizza चे मालक आणि शेफ आहेत. त्यांच्या या संकल्पनेचा जन्म एका अनुभवातून झाला. पुण्यातील गुडलक चौकात त्यांनी काही गरीब मुलांना शिळा बर्गर आणि पिझ्झा खाताना पाहिलं. “पुन्हा कधी पिझ्झा खाणार?” या प्रश्नावर मुलांनी “जेव्हा कुणी देईल, तेव्हा खाऊ” असं उत्तर दिलं. या वाक्याने सर्वेश यांना खूपच विचार करायला लावलं. त्याच क्षणी त्यांनी एक असा पिझ्झा तयार करण्याचं ठरवलं, जो सर्वांनाच परवडेल. त्यातून जन्म झाला “बटन पिझ्झा”चा!
Repos Energy Success Story: डोअरस्टेप डिझेलपासून २०० कोटींच्या वाटचालीपर्यंत: पुण्यातील दाम्पत्याचा स्टार्टअप !
काय आहे “बटन पिझ्झा”? What is World’s Smallest ‘Button Pizza’
बटन पिझ्झा हा जगातील सर्वात छोटा पिझ्झा आहे.
याचा आकार फक्त 1 इंच आहे, म्हणजेच डोळ्याच्या बुबुळाएवढा लहान! हा पिझ्झा सर्वसामान्य पिझ्झाप्रमाणेच आहे – बेस, मोजरेला चीज, कॅप्सिकम आणि इतर सामग्रींसह. मात्र, किंमत केवळ एक रुपया!
बटन पिझ्झाचा वर्ल्ड रेकॉर्ड World record Of “Pune’s Button pizza”
सर्वेश आणि त्यांच्या टीमने एका दिवसात 4,668 बटन पिझ्झा तयार करून वर्ल्ड रेकॉर्ड केला. यामुळे “जगातील सर्वात छोटा पिझ्झा” ही ओळख बटन पिझ्झाने मिळवली. ही संकल्पना केवळ विक्रमी नव्हे, तर गरिबांना परवडेल अशी आहे.
का खास आहे बटन पिझ्झा? What makes “Pune’s Button pizza” Special
1. स्वस्त आणि चवदार: केवळ एका रुपयात गरीब आणि गरजू लोकांनाही पिझ्झाचा अनुभव घेता येतो.
2. सामाजिक जबाबदारी: फ्री फूड देण्याऐवजी लोकांनी स्वतः कमावून खावं, यावर सर्वेश यांचा विश्वास आहे.
3. पोषणाची काळजी: पिझ्झा लहान असला तरी पोषणमूल्ये तितकीच आहेत.
सर्वेशची “बटन पिझ्झा” साठी प्रेरणा आणि तत्त्वज्ञान |World’s Smallest ‘Button Pizza’ Crafted by a Pune Chef
सर्वेश यांच्या मते, “फुकट दिलेले अन्न कुणालाही महत्त्वाचे वाटत नाही. म्हणूनच मी लोकांना त्यांचं अन्न स्वतः कमवायला शिकवतो. गरजू लोकांना कामाच्या संधी देऊन अन्न मिळवण्याची सवय लावली पाहिजे.”
त्यांच्या कॅफेमध्ये “रोजचं ताजं आणि गुणवत्तापूर्ण अन्न” हा मुख्य नियम आहे. ते स्वतः रोजच्या रोज लागणाऱ्या वस्तू खरेदी करतात, जेणेकरून अन्न वाया जाणार नाही.
बटन पिझ्झाचा समाजावर परिणाम व शेफ सर्वेश यांची आगळीवेगळी दृष्टी
आजपर्यंत 8 लाखांहून अधिक बटन पिझ्झा विकले गेले आहेत. या उपक्रमामुळे हजारो गरीब मुलांना एक रुपयात पिझ्झाचा आनंद घेता आला आहे. शिवाय, मोठ्या संख्येने लोक बर्थडे पार्टीसाठी आणि इतर कार्यक्रमांसाठी बटन पिझ्झाची ऑर्डर देतात.
सर्वेश यांची फक्त बटन पिझ्झाच नाही, तर त्यांच्या इतर उपक्रमांमुळेही त्यांची ओळख आहे. ते इंदो-फ्युजन पदार्थांवर काम करतात. त्यांच्या कॅफेची टॅगलाइनही खास आहे – “अळूच्या फतफद्यापासून मोरोक्कोपर्यंत सर्वकाही!”
“बटन पिझ्झा” चे भविष्यातील उद्दिष्ट | 1 rupee Button Pizza pune
सर्वेश यांचा हा उपक्रम फक्त अन्न देण्यासाठी नसून, भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या मते, “आपल्या पदार्थांवर प्रेम करा, परंतु इतरांचे आदर करा.”
बटन पिझ्झा केवळ पिझ्झा खाण्याचा अनुभव देत नाही, तर गरिबांसाठी स्वाभिमानाने जीवन जगण्याचा एक नवीन मार्ग उघडतो.
तुम्हीही या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचा भाग होऊ शकता! पुण्यातील “रिका कॅफे“ला भेट द्या आणि जगातील सर्वात छोट्या पिझ्झाचा अनुभव घ्या.
cafe house reeka / Button Pizza Address Pune
Best Hangout place in Kothrud… Managed by enthusiastic team of Chef Sarvesh
Next to Vijay Sales, Kothrud, Pune, Maharashtra 411038
FAQS?
1. बटन पिझ्झा नेमका काय आहे?
उत्तर: बटन पिझ्झा हा जगातील सर्वात छोटा पिझ्झा आहे, ज्याचा आकार फक्त 1 इंच आहे. त्यात बेस, चीज, आणि भाजीसाहित्य असते, आणि त्याची किंमत फक्त 1 रुपया आहे.
2. बटन पिझ्झा कसा तयार केला जातो?
उत्तर: बटन पिझ्झा सर्वसामान्य पिझ्झाप्रमाणेच बनतो. पिझ्झा बेसवर मोजरेला चीज, कॅप्सिकम व इतर टॉपिंग्स ठेवून त्याला लहान आकारात तयार केले जाते.
3. बटन पिझ्झा पुण्यात कुठे विकत मिळतो?
उत्तर: बटन पिझ्झा पुण्यातील “रिका कॅफे”मध्ये उपलब्ध आहे, ज्याचे मालक आणि शेफ सर्वेश जाधव आहेत.
4. बटन पिझ्झाचा उद्देश काय आहे?
उत्तर: गरिबांनाही पिझ्झाचा आनंद घेता यावा यासाठी सर्वेश यांनी बटन पिझ्झाची संकल्पना साकारली आहे. फुकट अन्न देण्याऐवजी लोकांना ते परवडेल, असे त्यांनी केले आहे.
5. पुण्याच्या बटन पिझ्झाने कोणता विक्रम (वर्ल्ड रेकॉर्ड) केला आहे?
उत्तर: एका दिवसात 4,668 बटन पिझ्झा तयार करून सर्वेश जाधव आणि त्यांच्या टीमने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे
5 thoughts on “1rs Button Pizza! पुण्याच्या शेफने रचला इतिहास |Pune Chef Creates the World’s Smallest Pizza for Just ₹1!”