Cyber Parcel Fraud Alert| पुण्यात इंजीनियर  आणि खाजगी कर्मचारी १६.४८ लाखांच्या पार्सल फ्रॉडचे  बळी |काय आहे “पार्सल फ्रॉड” वाचा सविस्तर 

WhatsApp Channel Follow Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Follow Now

Cyber Fraud in Pune: Rs 16.48 Lakh Parcel Scam Pune News 30 nov : पुण्यात सायबर गुन्हेगारांनी १६.४८ लाख रुपयांची फसवणूक करत दोन व्यक्तींना मोठा आर्थिक फटका दिला आहे. पीडितांमध्ये २८ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता आणि एका खाजगी कंपनीतील ४९ वर्षीय कर्मचारी यांचा समावेश आहे. या घटना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत घडल्या असून, चतुश्रुंगी आणि कळेपडळ पोलिस ठाण्यांमध्ये वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

पहिले प्रकरण: सॉफ्टवेअर अभियंत्याला “पार्सल फ्रॉड”मध्ये गंडवले | Cyber Parcel Fraud Alert

ऑगस्ट महिन्यात घडलेल्या पहिल्या घटनेत, एका २८ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याला एका अनोळखी व्यक्तीकडून फोन आला. त्या व्यक्तीने स्वतःला एका मोठ्या कुरिअर कंपनीचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगितले आणि दावा केला की, इंजीनियरच्या  नावाने इराणला एक पार्सल पाठवण्यात आले आहे. त्या पार्सलमध्ये ड्रग्स, पासपोर्ट, आणि लॅपटॉप असल्याचेही सांगण्यात आले.

या कथित प्रकरणातून आपले नाव काढून घेण्यासाठी  , त्यांना पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट घेण्यास सांगितले गेले. विश्वास निर्माण करण्यासाठी, सायबर गुन्हेगारांनी काही बनावट कागदपत्रे पाठवली. गोंधळलेल्या अभियंत्याने प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १० लाख रुपये तमिळनाडूतील एका बँक खात्यात ट्रान्सफर केले. पैसे पाठवून त्यांचे नाव प्रकरणातून काढण्यात येइल, अशी त्यांना खात्री देण्यात आली. मात्र, काही दिवसांनी हा सर्व प्रकार फसवणूक असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

दुसरे प्रकरण: खाजगी कर्मचारी मनी लॉन्डरिंगच्या बनावट दाव्याला बळी |Private Employee Fall Victim to Rs ६.४८  Lakh Parcel Scam

दुसऱ्या प्रकरणात, एका ४९ वर्षीय खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्याला एका अनोळखी कॉलवर विश्वास ठेवण्याची मोठी चूक झाली. सायबर गुन्हेगारांनी त्यांना सांगितले की, त्यांच्या आधार कार्डचा वापर मनी लॉन्डरिंग आणि ड्रग्स व्यापारासाठी होतो आहे. हा गुन्हा रोखण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील, असे सांगण्यात आले.

पीडित व्यक्तीने सायबर गुन्हेगारांच्या दबावाखाली येत, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ६.४८ लाख रुपये ट्रान्सफर केले. पैसे पाठवल्यानंतरही त्यांना सतत पैसे मागण्यात आले, ज्यामुळे त्यांना हा प्रकार संशयास्पद वाटला. अखेर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा | Cyber Parcel Fraud Alert

या दोन्ही घटनांनंतर, पुणे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी फोन कॉल्स, ईमेल्स किंवा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. खासकरून, जर कोणी तुमच्याकडून पैशांची मागणी करत असेल, तर तो फसवणुकीचा प्रकार असू शकतो. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारापूर्वी त्या व्यक्तीची ओळख आणि सत्यता पडताळून पाहा. जर संशयास्पद काही आढळले, तर लगेच सायबर क्राइम विभागाशी संपर्क साधा.

सायबर गुन्हेगारीपासून वाचण्यासाठी टिप्स | Simple Tips To Avoid Cyber Scam

या घटनांमधून आपण काय शिकू शकतो? सायबर सुरक्षेसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा:

  1. अनवधानाने माहिती शेअर करू नका – ओळखपत्र, बँक खाते किंवा अन्य वैयक्तिक माहिती शेअर करण्याआधी दोनदा विचार करा.
  2. अनोळखी कॉल्सपासून सावध रहा – कोणतीही संस्था फोनवरून पैशांची मागणी करत नाही.
  3. बँक व्यवहारांवर लक्ष ठेवा – तुमच्या खात्यातून अनधिकृत व्यवहार होत असल्यास त्वरित कारवाई करा.
  4. सायबर पोलिसांशी संपर्क करा – संशयास्पद वर्तन दिसल्यास तत्काळ तक्रार नोंदवा.

सायबर गुन्हेगार दिवसेंदिवस अधिक हुशार होत चालले आहेत. तुमचे नाव, ओळख, किंवा आर्थिक माहिती यावरून कोणीही तुमच्यावर दबाव आणत असेल, तर आधी सत्यता पडताळा. अशा प्रकारची सतर्कता तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवू शकते. फसवणुकीचे प्रमाण वाढत असले तरी नागरिकांनी जागरूक राहून आणि तांत्रिक माहितीची माहिती करून घेऊन त्याला आळा घालता येतो.

सावध रहा, सुरक्षित रहा | Cyber Parcel Fraud Alert
सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकार आणि पोलिस प्रयत्न करत असले तरीही, नागरिकांनी स्वतः सतर्क राहणे महत्त्वाचे आहे. सायबर फसवणुकीच्या कोणत्याही प्रकाराला बळी पडू नये यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि पोलिसांच्या सूचना पाळणे गरजेचे आहे.

अशा घटनांची संख्या खूप वाढत आहे , तरी तुमच्या परिवारातील सदस्याना व मित्राना ही बातमी शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा अश्या सायबर फ्रॉड पासून वाचू शकतील. धन्यवाद ! 

पुण्यात कडाक्याची थंडी:

लाडक्या बहिणींसाठी खास खुशखबर! 

Spread the love

1 thought on “Cyber Parcel Fraud Alert| पुण्यात इंजीनियर  आणि खाजगी कर्मचारी १६.४८ लाखांच्या पार्सल फ्रॉडचे  बळी |काय आहे “पार्सल फ्रॉड” वाचा सविस्तर ”

Leave a Comment