घटनेचा तपशील : Kothrud Elderly Man Threatened With Video Leak: Caretaker Demands ₹5 Lakh
Kothrud Elderly Man Threatened With Video Leak Pune News today 23 nov :पुण्यातल्या कोथरुड भागात एक विचित्र आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका वृद्ध व्यक्तीला त्यांच्या खासगी व्हिडीओज् आणि फोटोंचा गैरवापर करण्याची धमकी देत, ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात पिडीतच्या कुटुंबाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, कोल्हापूरच्या जैनापूर गावातील सूरज राजेंद्र पवार (वय ३२) याच्यावर आरोप करण्यात आले आहेत. कोथरुडमधील एका कुटुंबाने आपल्या आजारी वडिलांसाठी केअरटेकर नेमला होता परंतु . मूळ केअरटेकरला वैयक्तिक कारणांमुळे कोल्हापूरला जावं लागल्यानंतर, त्याने आपल्या जागी सूरज पवारला कामावर नेमलं.
काम करत असताना, घरी दुसरे कोण नाही याचा फायदा घेऊन , सूरज पवारने वृद्ध व्यक्तीचे फोटो आणि व्हिडीओ घेतले. यानंतर, या फोटो-व्हिडीओंचा वापर करून तो कुटुंबाला ब्लॅकमेल करू लागला. त्याने व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली आणि ५ लाख रुपये देण्याची मागणी केली.
धास्तावलेल्या कुटुंबाने याबाबत तातडीनं पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तक्रार दाखल केली असून सूरज पवारविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
ही घटना स्पष्टपणे दाखवते की, केअरटेकर नेमण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी ( बॅकग्राऊंड ) नीट तपासणे किती आवश्यक आहे. योग्य तपासणी न केल्याने अशा प्रकारच्या धोक्यांना सामोरं जावं लागू शकतं.
अशी काळजी घेतली पाहिजे : This Is How You Can Protect Your Elders
त्यामुळे जर आपल्या घरी सुद्धा कोणी कामगार , केअरटेकर असतील तर 1)केअरटेकरची कामगिरी आणि वृद्ध व्यक्तीच्या सुरक्षेचा ताळमेळ ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा.तसेच
2) अनुभवी पेशंट केअर कंपन्यांच्या सेवा घ्या.
3) तसेच वृद्ध व्यक्तींना स्मार्टफोन किंवा इतर उपकरणं वापरण्याचं प्राथमिक प्रशिक्षण दिल गेले पाहिजे
या छोट्या पण महत्वाच्या बदलातून आपण संभाव्य धोका टाळू शकतो व आपल्या परिवारातील लोकाना अशा त्रासदायक गोष्टींपासून लांब ठेवू शकतो . ही बातमी तुमच्या कुटुंबासोंबत तसेच मित्राना शेअर करा. व अश्याच नवनवीन बातम्यासाठी आपल्या instagram , whastapp चॅनल ला जॉइन काराईला विसरू नका !
2000 ची SIP करा आणि मिळवा 3.18 crore लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये