Mrunal dusanis new business:चार वर्षांनंतर मायदेशी परतलेल्या आपल्या लाडक्या मराठमोळ्या अभिनेत्री मृणाल दुसानीसने अभिनय क्षेत्राबाहेर नवं पाऊल उचललं आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मृणालने आता मुंबईत स्वतःचं आलिशान (बेली लाफ्स् बिस्त्रो अँड टॅप )Belly Laughs Bistro and Tap नावाचं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. तिच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि आनंद आहे.
‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतील तिच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या मृणालने चार वर्षांपूर्वी लग्न करून परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या या निर्णयामुळे ती मालिका विश्वातून दूर गेली होती, मात्र तिच्या चाहत्यांनी तिच्यावरचं प्रेम कायम ठेवले. आता परदेशात चार वर्षं घालवल्यानंतर ती पुन्हा भारतात परतली आहे. विशेष म्हणजे, या परतीसोबतच तिने एक वेगळा निर्णय घेत स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.
मृणालने ठाण्यातील पवई परिसरात स्वतःचं रेस्टॉरंट सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. तिने काही दिवसांपूर्वी व्यवसाय सुरू करण्याबाबत एक हिंट दिली होती, मात्र नेमका कोणता व्यवसाय आणि कुठे हे गुपित ठेवलं होतं. अखेर या गुपिताचा उलगडा झाला आहे आणि तिच्या रेस्टॉरंटचा एक खास व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने रेस्टॉरंटच्या उभारणीपासून ते बांधकामाच्या प्रत्येक टप्प्याचा मागोवा घेत चाहत्यांना हा प्रवास दाखवला आहे. तिच्या या निर्णयावर नेटकऱ्यांनी तिला प्रचंड शुभेच्छा दिल्या आहेत.
रेस्टॉरंट मध्ये लावली मराठी कलाकारांनी हजेरी Belly Laughs Bistro and Tap Thane
वंदना गुप्ते , ज्ञानदा रामतिर्थकर, शर्मिष्ठा राऊत तसेच बाकी मराठी कलाकारांनी रेस्टॉरंट ला भेट देऊन मृणाली ला पुढील भविष्यासाठी शुभेच्या दिल्या.
काहींनी त्यांच्या चाहत्यांना आव्हाहन केले की (बेली लाफ्स् बिस्त्रो अँड टॅप) ला भेट देऊन स्वतः तेथील सुंदर माहोल आहे त्याचा अनुभव घ्या.
चाहत्यांचा प्रतिसाद आणि जुन्या आठवणी : Mrunal dusanis new business
मृणालचा रेस्टॉरंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहते तिच्या नवीन सुरुवातीबद्दल खूप आनंदी आहेत. “वाह! भारतात परतताच नवीन व्यवसाय सुरू केलास,” “नवीन सुरुवातीसाठी शुभेच्छा,” अशा अनेक कमेंट्समुळे तिच्या व्हिडीओचा फीड भरून गेला आहे. काहींनी “नवीन घर घेतलं का?” असा मजेशीर प्रश्न विचारला, तर काहींनी “तुझ्या हॉटेलला भेट द्यायचं आता प्लॅनिंग करतोय,” असंही म्हटलं आहे. मृणालच्या चाहत्यांना तिच्या परतीबरोबरच तिच्या जुन्या मालिका आणि भूमिकांची आठवणही झाली आहे.
‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘असं सासर सुरेख बाई’, आणि ‘सुखांच्या सरीचे हे मन बावरे’ यांसारख्या मालिकांमधील तिच्या दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांचं हृदय जिंकलं होतं. मालिकांमध्ये तिचा साधेपणा आणि अभिनयातील सहजता पाहून तिच्या चाहत्यांमध्ये तिचं एक वेगळंच स्थान निर्माण झालं.
अभिनयाबरोबर व्यवसायातही नाव कमावण्याची तयारी: Mrunal dusanis new business
मृणाल दुसानीसचा हा निर्णय खरोखरच प्रेरणादायी आहे. चार वर्षांनंतर मायदेशी परतून केवळ अभिनयाचं नव्हे, तर स्वतःच्या स्वप्नांचंही रेशीम विणत तिने व्यवसायात प्रवेश केला आहे. अभिनयाच्या प्रवासाइतकंच तिच्या या व्यवसायिक प्रवासालाही यश मिळावं, अशी तिच्या चाहत्यांची प्रार्थना आहे. तिचं हे रेस्टॉरंट तिच्या अभिनयासारखंच यशस्वी होईल, यात शंका नाही.
Pune Best Places To Visit In This Winter
2 thoughts on “Mrunal dusanis new business | मराठमोळ्या मृणाल दुसानीसचा नवा प्रवास: ठाण्यात केल रेस्टॉरंट सुरू”