Singham Again Movie Detailed Review: मित्रानो! ,स्वागत आहे आपल्या कोथरुडकर.कॉम च्या वेबसाईट वर, बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण याच्या “सिंघम अगेन” चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली आहे! “शैतान,” “मैदान,” आणि “औरों में कहां दम था” मधील अजयच्या भूमिकेननंतर , आता रोहित शेट्टी दिग्दर्शित “सिंघम अगेन” ने थिएटरवर धडाक्यात एन्ट्री घेतली आहे. व त्यामुळे सिंघम अगेन ची चाहत्यांमध्ये एकच चर्चा आहे.
तगडी कास्ट, दमदार कथेचा धमाका!
सिंघम अगेन या चित्रपटात केवळ अजय देवगणच नव्हे, तर रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, करिना कपूर खान, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर यांसारखे स्टार्स आहेत. सोबतच, सलमान खानचा “चुलबुल पांडे” म्हणून विशेष कॅमिओही आहे, कास्टपासून संगीतापर्यंत आणि ऍक्शन सीन्सपर्यंत “सिंघम अगेन” ने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.
Maharashtra’s Richest MLA Parag Shah: संपत्तीत ५७५% वाढ ,३३०० कोटींचा टप्पा गाठला
पहिल्या दिवशीची कमाई: जगभरात ६५ कोटींचा धमाका | Singham Again Movie Detailed Review
सॅक्निल्कच्या अहवालानुसार, “सिंघम अगेन” ने पहिल्या दिवशीच तब्बल ६५ कोटींची जागतिक स्तरावर कमाई केली आहे! भारतातच नव्हे, तर परदेशातही चित्रपटाने पहिल्या दिवशी १२.८ कोटी रुपयांची कमाई करून रसिकांची मने जिंकली आहेत.
दुसऱ्या दिवशी १०० कोटींचा आकडा पार होणार का?
Singham Again Worldwide Box Office Collection Day 2 Prediction
दुसऱ्या दिवशी (शनिवार) “सिंघम अगेन” १५-२० कोटींची परदेशी बाजारात कमाई करेल, असा अंदाज आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर दुसऱ्या दिवशी ९०-१०० कोटींच्या आसपास चित्रपटाची एकूण कमाई होऊ शकते. दरम्यान, कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांच्या “भूल भुलैया ३” शी थेट टक्कर देणाऱ्या “सिंघम अगेन” चे यश कोठे थांबते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
सिंघम अगेन: बॉक्स ऑफिस कलेक्शन टेबल | Singham Again Movie Detailed Review
दिनांक | भारतातील कमाई (कोटी रुपये) | परदेशातील कमाई (कोटी रुपये) | एकूण जागतिक कमाई (कोटी रुपये) |
पहिला दिवस | 52.2 कोटी | 12.8 कोटी | 65 कोटी |
दुसरा दिवस (अंदाज) | 70 कोटी | 15-20 कोटी | 90-100 कोटी |
टिप: दुसऱ्या दिवशी चित्रपटाची जागतिक स्तरावर १०० कोटींच्या आसपास कमाई होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे “सिंघम अगेन” बॉक्स ऑफिसवर मोठे यश प्राप्त करू शकतो.
पुण्यातील धक्कादायक घटना ,खून की मृत्यू ?Dead body of 60 yr Old Man found On Sinhagad Fort
चित्रपट चाहत्यांना एक अभूतपूर्व भेट: Singham Again Movie Detailed Review
“singham again ” मध्ये अजय देवगणचा बाजीराव सिंघम पुन्हा थेट आणि जबरदस्त दिसतोय. त्याच्या रुद्र अवताराचा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षक पुन्हा एकदा चित्रपटगृहांकडे वळत आहेत. दिवाळीच्या सणासुदीत हा अजयचा चित्रपट चाहत्यांना एक अभूतपूर्व भेट ठरली आहे.
चित्रपटाचा रिव्यू | Detailed Singham Returns Movie Review In Marathi
सिंघम अगेनमध्ये रोहित शेट्टीने आणखी एक दमदार अॅक्शन फिल्म चाहत्यांसाठी सादर केली आहे, ज्यात आपला आवडता पोलीस अधिकारी बाजीराव सिंघम (अजय देवगण) पुन्हा एकदा न्यायासाठी लढताना दिसतो. पण यावेळी सगळं थोडं अधिक भव्य, रोमांचक आणि धोकादायक आहे. चित्रपटात अजय देवगणची जबरदस्त भूमिका, मोठ्या प्रमाणात देशभक्तीची भावना आणि बेधडक अॅक्शन दृश्यं आहेत, ज्यामुळे प्रेक्षक अक्षरशः खुर्चीतून खिळून बसतात.
कथा आणि सादरीकरण | Storyline and Execution
चित्रपटाची कथा साधारणतः नेहमी प्रमाने चांगल्या विरुद्ध वाईट यावरच आधारित आहे, पण रोहित शेट्टीने त्यात आजच्या समाजातील काही मुद्द्यांचा समावेश केलेला पहायला मिळतो आहे. सिंघमला सिम्बा (रणवीर सिंह) आणि सूर्यवंशी (अक्षय कुमार) यांसारख्या पोलीस सहकाऱ्यांची मदत आहे, आणि गुन्हेगारी टोळीविरोधात लढत असताना पहायला मिळाले . रोहित शेट्टी ची खासीयत म्हणजे गन फायट्स, आणि जबरदस्त अॅक्शन सीन्स आहेत.
अभिनय |Singham Again Movie Detailed Review
अजय देवगणने सिंघमच्या भूमिकेत चांगली छाप पाडली आहे. व रणवीरच्या सिम्बा आणि अक्षय कुमारचा सूर्यवंशी हे गंभीर प्रसंगांमध्ये थोडं हलकंफुलकं वातावरण तयार करताना दिसून आले , ज्यामुळे अॅक्शन आणि हास्याचा समतोल साधला जातो.
छायाचित्रण आणि दृश्य | Singham Again Movie Detailed Review
रोहित शेट्टी च्या चित्रपटातील अॅक्शन दृश्यं नेहमीच प्रेक्षकांवरती ठसा सोडताना दिसून येतात . त्यामध्ये मोठे स्फोट, हाय-स्पीड कार चेस, आणि स्लो-मोशन शॉट्स यामुळे प्रेक्षकांचं मन थक्क होतं.
संगीत आणि पार्श्वसंगीत | Singham Again Movie Detailed Review
चित्रपटातील संगीत हे कथा पुढे नेण्यासाठी मदत करते आहे, त्यात रोमांचक ट्रॅक्स आहेत जे तीव्र दृश्यांन वरती डोळे जोडून ठेवतात. पार्श्वसंगीत प्रभावी आहे, जे मुख्य प्रसंगांना अधिक गंभीरता आणते
सिंघम अगेन हा एक अॅक्शनप्रेमींसाठी आवर्जून बघण्याजोगा सिनेमा आहे. त्यात देशभक्ती, अॅक्शन, आणि प्रेक्षकांना अपेक्षित प्रत्येक गोष्ट आहे. काही प्रसंग अंदाजे असले तरी, जबरदस्त दृश्यांमुळे तो प्रेक्षकांसाठी एक छान अनुभव ठरतो आहे .
तरी चाहत्यानी नक्की हा सिनेमा बघावा व आपल्या प्रतिकिर्या आम्हाला कमेन्ट सेक्शन मध्ये सांगव्या . धन्यवाद !