कुणाल कामरा ने नोकरी स्वीकारली END OF OLA?|kunal kamra joins ola electric

WhatsApp Channel Follow Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Follow Now

kunal kamra joins ola electric: ओला बंद होणार ? भारतात इलेक्ट्रिक वाहनांची जस जशी  मागणी वाढली, तसेच त्याचवेळी ओला इलेक्ट्रिक स्कूटरने स्वतःचं वेगळं स्थान मार्केट मध्ये  निर्माण केलं. ओला इलेक्ट्रिक स्कूटर  ही सुरुवातीला रंगीबेरंगी आणि शांत चालणाऱ्या या स्कूटरने  भारतमधीन लोकांमध्ये खूप लोकप्रियता मिळवली. परंतु काही महिन्यांतच, या स्कूटरच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांच्या तक्रारी ह्या सोशल मीडियावर जास्त प्रमाणात पाहायला मिळाल्या.

यावर  प्रसिद्ध कॉमेडियन कुनाल कामरा यांनी ओला इलेक्ट्रिकवर प्रश्न उपस्थित केलेले दिसून येत आहे , यामुळे सोशल मीडिया वरती नवीनच एक वाद उभा राहिला आहे. 

या वादात ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल आणि कुनाल कामरा  यांच्यात x वरती ( ट्विटर) वर जंगी वाद झाला.

Table of Contents

कशी झाली वादाची सुरुवात कशी झाली ? kunal kamra joins ola electric

6 ऑक्टोबरला सकाळी 10:30 वाजता, कुनाल कामरा यांनी ओला शोरूमबाहेरच्या अनेक धूळखात उभ्या असलेल्या स्कूटरचा फोटो ट्विट केला. यात त्यांनी विचारलं, भारतीय ग्राहकांना खरंच आवाज आहे का?” आणि यासोबतच हेही विचारलं की, दुचाकी गाड्या अनेक कामगारांसाठी जीवनरेखा आहेत. यांनी @nitin_gadkari  यांना टॅग करून विचारले , अशा वेळी भारतीय ग्राहकांना अशा खराब स्कूटर्स वापरायला का मिळतात? आणि जय ओला वापरकर्ते आहेत त्यांनी आपापल्या समस्या शेअर करायला सांगितलं.

भाविश अग्रवाल यांनी घेतली वादामद्ध्ये उडी : kunal kamra joins ola electric

कुनालच्या ट्विटनंतर ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी यावर उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की,

“आपण खूप काळजी घेत असल्याने @ kunalkamra88, येऊन आम्हाला मदत करा! आपण या पेड ट्वीटसाठी किंवा आपल्या अयशस्वी विनोदी कारकीर्दीतून मिळवलेल्यापेक्षा मी जास्त पैसे देईन.

किंवा अन्यथा शांत बसून आपण वास्तविक ग्राहकांसाठी समस्या निश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करूया. आम्ही सर्व्हिस नेटवर्कचा वेगवान विस्तार करीत आहोत आणि बॅकलॉग लवकरच साफ केले जातील.”

यासोबतच त्यांनी कुनालला नकारात्मक टिप्पणी न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिला.

भाविश यांनी कुणाला कामारा वरती आरोप केला की , कुनालचे ट्विट्स “पेड” असू शकते . परंतु ,त्यावर कुनाल कामराने उत्तर दिलं की, त्यांच्या ट्विट्स पेड असतील तर ते आपल्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्स कायमचे डिलीट करतील. कॉमेडियन नाही बनू शकला तर आमच्याकडे काम करण्यासाठी येऊ शकता

भाविश अग्रवाल ने दिली कुणालला कामा साठी ऑफर :

ते म्हणाले की ,”आमच्याकडे आमच्या ग्राहकांसाठी पुरेशा योजना आहेत, विशेषतः सेवा विलंबास सामोरे जाण्यासाठी. तुम्ही खरे ग्राहक असता, तर तुम्हाला हे माहित असते.पुन्हा सांगतोय, यापासून दूर पळू नका. हाताच्या बोटावर टीका करण्याऐवजी, इथे या आणि खरे काम करा.”

यावर उत्तर देताना कुणाला म्हणाला की , ” गेल्या 4 महिन्यांमध्ये ओला खरेदी केलेल्या खऱ्या ग्राहकांना 100% रिफंड देऊ शकत नाही… पण तुम्ही मला पैसे द्यायला तयार आहात, जो तुमचा ग्राहक सुद्धा नाही.

मी तुम्हाला काही इतर पर्याय देऊ शकतो.

1/2 महिन्यांसाठी तुम्ही 85% रिफंड देऊ शकता का?

3 महिन्यांसाठी तुम्ही 75% रिफंड देऊ शकता का?

4 महिन्यांसाठी तुम्ही 65% रिफंड देऊ शकता का?

पळून जाऊ नका, मी खऱ्या ग्राहकांची यादी तयार करून त्यांना रिफंड मिळवून देण्यात मदत करू शकतो. त्यांची संतुष्टि हीच माझी पेमेंट असेल.

तुम्ही मला कामावर घेण्याऐवजी तुमच्या खऱ्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित केल्यावर मी माझ्या पुढच्या ट्विटमध्ये एक ईमेल आयडी देईन.”

कॉमेडियन कुणाल कामरा यांनी ओला इलेक्ट्रिकमध्ये ‘नोकरी स्वीकारली’ असं जाहीर केलं:

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी ओला इलेक्ट्रिकच्या ग्राहक सेवेत सुधारणा करण्यासाठी काही मजेशीर पण ठाम मागण्या मांडल्या आहेत. त्यांनी ओला सीईओ भाविश अग्रवाल यांना उद्देशून X (पूर्वी ट्विटर) वर पोस्ट शेअर केली, ज्यात ग्राहकांच्या सेवेची सुधारणा करण्यासाठी काही मुख्य मागण्या सुचवल्या आहेत. त्यातील महत्वाच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:

1)७ दिवसांत स्कूटर दुरुस्तीची हमी: कामराची पहिली मागणी म्हणजे ओलाने आपल्या अधिकृत सर्व्हिस सेंटरवरून ग्राहकांच्या स्कूटरची दुरुस्ती सात दिवसांत पूर्ण करावी.

2)विलंब झाल्यास नुकसान भरपाई: जर स्कूटरची दुरुस्ती सात दिवसांच्या आत पूर्ण झाली नाही, तर ओलाने ग्राहकांना तात्पुरती स्कूटर किंवा दररोज ५०० रुपयांचा प्रवासी भत्ता द्यावा. याशिवाय, उशीराच्या प्रत्येक दिवशी ५०० रुपये अतिरिक्त नुकसान भरपाई देण्याची मागणीही कामराने केली आहे, ज्याची मर्यादा ५०,००० रुपयांपर्यंत असावी.

3)इन्शुरन्स कव्हरेज: कामराच्या मते, प्रत्येक नवीन ओला स्कूटरसोबत दोन इन्शुरन्स पॉलिसीचा समावेश असावा: एक स्कूटरसाठी आणि दुसरी ग्राहक सेवेच्या आवश्यकतेसाठी, ज्यात दुसरी इन्शुरन्स पॉलिसी विनामूल्य असावी.

कामराच्या या विनोदी आणि ठाम मागण्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत. काहींनी ग्राहकांसाठी या सुधारणा योग्य असल्याचे म्हटले, तर काहींनी ओलाला संधी देण्याचे समर्थन केले

स्कूटरच्या समस्यांच्या आकडा महिन्याला 80000 पर्यन्त : kunal kamra joins ola electric

मिंटच्या अहवालानुसार, ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या समस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महिन्याला 80000 पर्यन्त हा आकडा गेला आहे .ओला सर्व्हिस सेंटरमध्ये दररोज 6,000 ते 7,000 स्कूटर दुरुस्तीकरिता येत आहेत. ओलाने आता नव्या टीमची स्थापना केली असून, या टीमद्वारे दुरुस्ती प्रक्रियेवर लक्ष ठेवले जाणार आहे.

भाविश अग्रवाल यांनी याबाबत दिलासा देत सांगितलं की, कंपनी या समस्यांवर काम करत आहे आणि लवकरच ग्राहकांच्या समस्या सोडवल्या जातील.

ग्राहकांना योग्य सेवा मिळणार का हा मुद्दा कायम आहे!

कुनाल कामरा आणि भाविश अग्रवाल यांच्यातील वादाचा मूळ मुद्दा म्हणजे ग्राहकांचा आवाज ऐकला जातो का? ओलासारख्या कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना योग्य सेवा आणि समाधान देणे महत्त्वाचे आहे. भारतीय ग्राहकांना मिळणाऱ्या अनुभवांचा विचार करून कंपन्यांनी आपल्या सेवा आणखी चांगल्या कराव्यात.

तुमचं मत काय आहे? कुनाल किंवा भाविश, तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की शेअर करा!


या दिवाळी मध्ये OTT वर काय पाहाल

Spread the love