Three Planes Received Fake Bomb Threats In Pune: २४ ऑक्टोबर २०२४, गुरुवारी भारतभरात खळबळ उडवणारी एक घटना घडली, ज्यात तब्बल ८० विमानांना सोशल मीडियावरून बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. या विमानांमध्ये पुणे विभागात जाणाऱ्या तीन प्रमुख विमानांचा समावेश होता. दोन इंडिगो आणि एक अकासा एअरच्या विमानांना ही खोटी धमकी मिळाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, तातडीने उचललेल्या सुरक्षाविषयक पावलांमुळे मोठा अनर्थ टळला.
विमानाची करण्यात आली तपासनी : Three Planes Received Fake Bomb Threats in pune
पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी या घटनांबाबत स्पष्टीकरण देत सांगितले की, पुण्यातील एका विमानाची प्रत्यक्षपणे तपासनी करण्यात आली . ही सुरक्षा तपासणी या प्रकारामुळे अतिशय कडक पद्धतीने पार पडली. पुणे-जोधपूर आणि कोलकाता-पुणे या इंडिगोच्या विमानांना तसेच पुणे-कोलकाता अकासा एअरच्या विमानाला या धमक्यांचा उद्देश होता.
धमक्या मिळाल्यानंतर, कोलकाता-पुणे इंडिगो फ्लाइट (6E-135) दुपारी १.४० वाजता पुणे विमानतळावर उतरताच प्रवाशांची आणि विमानाची काटेकोर तपासणी करण्यात आली. प्रवाशांना तात्काळ सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले, आणि कोणतीही शंका न राहिल्याची खात्री झाल्यानंतर विमानाला राजकोटला जाण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, ही तपासणी पूर्ण होईपर्यंत विमानाचे उड्डाण तब्बल दोन तास उशिराने म्हणजे ४.२० वाजता झाले.
या सोशल मीडिया X (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून आल्या होत्या धमक्या : Threats Given By “X” Account | Three Planes Received Fake Bomb Threats in pune
या धमक्यांमागील मूळ स्रोत शोधण्यासाठी तात्काळ तपास सुरू करण्यात आला. संबंधित धमक्या @adamlanza222 या सोशल मीडिया X (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून आल्या होत्या. या खात्यावरून विमानांमध्ये बॉम्ब असल्याचा दावा करण्यात आला होता. सूत्रांनी सांगितले की, या अकाऊंटमधून देशभरात अनेक विमानांचे क्रमांक देऊन त्यात बॉम्ब ठेवले असल्याचे म्हटले होते. विमानतळ अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणा या धमक्यांवर बारकाईने लक्ष ठेवून काम करत होते.
सध्या ही अकाऊंट X वेबसाइट ने सस्पेंड केल आहे .
या घटनेनंतर, पुणे विमानतळाबरोबरच जोधपूर आणि कोलकाता विमानतळांवरही कडक सुरक्षा तपासणी करण्यात आली. अकासा एअरच्या पुणे-कोलकाता फ्लाइटची कोलकाता विमानतळावर, तर इंडिगोच्या पुणे-जोधपूर विमानाची जोधपूर विमानतळावरही यथोचित तपासणी झाली.
इंडिगोने या घटनांची अधिकृतरीत्या पुष्टी केली. “फ्लाइट 6E 133, जी पुण्याहून जोधपूरकडे जात होती, तसेच फ्लाइट 6E 135, जी कोलकाताहून पुण्याकडे येत होती, या दोन्ही विमानांना सुरक्षा अलर्ट मिळाल्यानंतर आम्ही त्वरित योग्य ती पावलं उचलली. आमच्या ग्राहकांची सुरक्षा आणि त्यांच्या प्रवासातील अनुभव सुरक्षित ठेवणे हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी सहकार्य करून मानक कार्यपद्धतींचे पालन करण्यात आले,” असे इंडिगोच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.
अकासा एअर ला मिळाल्या १४ विमानांना अशा धमक्या : Akasa Air 14 Aeroplanes Got Same Threats | Three Planes Received Fake Bomb Threats in pune
अकासा एअरने देखील त्यांच्या १४ विमानांना अशा धमक्या मिळाल्याची पुष्टी केली आहे. अकासा एअरने सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या आहेत आणि कोणत्याही अप्रिय घटनेचा धोका नाही याची खात्री केली आहे.
प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण: | Three Planes Received Fake Bomb Threats in pune
या घटनेनंतर प्रवाशांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली असली तरी, विमानतळ प्रशासन आणि विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आणि कठोर तपासणी करून विमानांना पुढील प्रवासासाठी परवानगी दिली. अशा प्रकारच्या घटनांनी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते, मात्र प्रशासनाच्या तात्काळ आणि प्रभावी उपाययोजनांमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
2 thoughts on “Three Planes Received Fake Bomb Threats in pune | पुणे विमानतळावर कडक सुरक्षा उपाय 2024”