Diwali shopping in pune 2024 | पुण्यात दिवाळी ची खरेदी कुठे करावी?

WhatsApp Channel Follow Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Follow Now


Diwali shopping in pune: दिवाळी आपल्या हिंदू सणांपैकी मोठा आणि महत्त्वाचा सण.
दिवाळी आश्विन आणि कार्तिक महिन्यात येते. हिंदू कॅलेंडर प्रमाणे मोठी दिवाळी किंवा लक्ष्मि पूजन कार्तिक महिन्याच्या १५व्या अमावस्येच्या दिवशी साजरा होतो. पैकी यंदाची दिवाळी २८ ऑक्टोबर २०२४ ला.
दिवाळी म्हणलं की सुरू होते आपली खरेदीची लगबग.. कपडे, दिवे, आकाशकंदील, रांगोळी, फराळासाठी लागणारं सामान इत्यादी सर्व च गोष्टी एकाच ठिकाणी मिळाल्या तर खरेदी अगदी सोपी होउन जाईल नाही!?.. म्हणुन च आज माहिती घेऊयात पुण्यातल्या महत्वाच्या shopping markets ची जिथे तुम्हाला दिवाळी साठी लागणाऱ्या सर्व च गोष्टी खरेदी करता येतील.
१)लक्ष्मी रोड
पुण्यातल्या सगळ्यात जुन्या मार्केटस् पैकी एक म्हणजे लक्ष्मी रोड. लक्ष्मी रोड ला यंदा १०२ वर्ष पूर्ण झाली. सण, समारंभ अगदी खरेदी करायची असेल तर लक्ष्मी रोड ही पुणेकरांची पहिली पसंती. लक्ष्मी रोड हे नाव च समृद्धी दर्शवते. मागच्या अनेक वर्षांपासून ही बाजापेठ बरीच वाढत गेली आणि खरेदी साठी लोकांची इथे येण्याची संख्या कधी च कमी झाली नाही. तुम्हाला कपडे खरेदी करायचे असो किंवा दागदागिने असो, लक्ष्मी रोड त्यावर उत्तम पर्याय आहे.

कपडे खरेदी साथी

मूळचंद, आरिणी, कलाक्षेत्रम, हस्तकला ही लक्ष्मी रोड वरील काही नावाजलेली दुकाने.तसेच men’s Avenue, मूळचंद, cottonking हे काही top rated men’s wears ची दुकाने.

२)तुळशी बाग – |Diwali shopping in pune

लक्ष्मी रोड आणि बुधवार पेठे जवळ असलेली तुळशी बाग ही पुण्यातल्या प्रसिद्ध बाजारपेठांपैकी एक. ही जूनी बाजारपेठ असली तरी आज ही स्त्रियांची इथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते.स्वस्तात मस्त खरेदी म्हणजे तुळशी बाग. तुळशी बागेत ही तुम्हाला  कपड्यांची, दागिन्यांची, पूजेच्या साहित्याची, सौंदर्य प्रसाधने अशा सर्व प्रकारची दुकाने दिसतात, तिथे च काही रेस्टॉरंट्स आहेत जिथे तुम्ही खरेदी करून उत्तम जेवणाचा आस्वाद घेऊ शकता.
लोकेशन


३) रविवार पेठ| Diwali shopping in pune
रविवार पेठ हे पुण्यातलं प्रसिद्ध बाजारपेठांपैकी एक. रविवार पेठ हे खूप मोठं मार्केट आहे आणि इथे सगळया प्रकारच्या वस्तूंची दुकाने तुम्हाला पाहायला मिळतील.दिवाळीसाठी लागणाऱ्या सगळया प्रकारचे सजावटीचे सामान तुम्हाला इथे अगदी सहज मिळू शकते .jewellery, imitation jewellery ची ही अनेक दुकाने इथे आहेत. घरगुती वस्तू, दिवाळीच्या फराळासाठी लागणाऱ्या वस्तू, खाद्यपदार्थ ह्यांची ही इथे बरीच दुकाने आहेत. थोडक्यात, रविवार पेठेत खरेदीसाठी गेलात तर अशी कोणतीच वस्तू नाही जी तुम्हाला इथे मिळणार नाही.
गणेश व्यापारी
लोकेशन

४)मंडई | Diwali shopping in pune
मंडई म्हणजे ब्रिटिश राजवटीतलं मार्केट, ज्याला पूर्वी लॉर्ड रे मार्केट म्हणत. पुण्याच्या शुक्रवार पेठेत हे मार्केट आहे. इथे कपडे ,सजावटीचे साहित्या, पूजेचे साहित्य, हार , फुले,jewellery ,खाद्यपदार्थ, फळे इत्यादी बऱ्याच वस्तूंची खरेदी तुम्ही करू शकता.
लोकेशन

५) महालक्ष्मी मार्केट – | Diwali shopping in pune

मंडईला लागूनच महालक्ष्मी मार्केट आहे. या मार्केट मध्ये ही सर्व प्रकारची दुकाने आहेत. कपडे, दागिने आणि बरच काही.
लोकेशन

५)गुजरात कॉलनी – गुजरात कॉलनी ही कोथरुड परिसरातील पौड रोड ला लागून असलेली छोटीशी बाजारपेठ. गुजरात कॉलनीत ही सगळया प्रकारच्या वस्तूंची दुकाने इथे आहेत . सोन्या चांदीच्या खरेदी पासून ते कपडे, भांडी, हार,फुले, फळे, पूजेचे साहित्य, घरगुती वस्तुंपर्यंत सर्व काही तुम्ही इथे खरेदी करू शकता.
लोकेशन

लहान मुलांचे कपडे कुठे घ्यावेत? | Diwali shopping in pune
दिवाळी साठी तुमच्या लहान मुलांसाठी छान पारंपारिक कपडे तुम्हाला घ्यायचे असतील तर हाऊस ऑफ क्रिती तुम्ही नक्की खरेदी करू शकता. हाऊस ऑफ क्रीती मधील कपडे हे वेगळया युनिक,डिझाईन्स चे आहेत आणि तुम्ही कपडे आपल्या आवडीनुसार कस्टमाईझ ही करू शकता.
कोथरुडच्या दुर्गा कॅफे समोरील teens parami मध्ये ही विविध प्रकारचे आणि साइज चे कपडे तुम्ही पाहू शकता.
House Of Kritee

दिवाळीसाठी पणत्या कुठे घ्याव्यात?

दिवाळीसाठी पणत्या अगदी सगळया बाजारपेठांमध्ये मिळतात पण कुंभारवाडा हे मातीच्या पणत्या मिळण्याचं मुख्य ठिकाणकुंभारवाड्यात मातीचे मडके, भांडी यांसोबत च मातीच्या पणत्या सुध्दा बनवल्या जातात.हा येथील रहिवाश्यांच्या पारंपारिक व्यवसाय आहे . मातीच्या वस्तू बनवणारी ही तिसरी पिढी तिथेसध्या राहत आहे. इथल्या जवळपास पसगळया घरांच्या बाहेर शेकडो पणत्या सुकवायला ठेवलेल्या दिसतात.

Location

मिठाईची दुकाने
दिवाळी सण मिठाई शिवाय अपूर्ण आहे. लक्ष्मी पूजन असो, भाऊबीज असो किंवा नातेवाईकांना, मित्रमंडळींना भेटवस्तू म्हणून द्यायचे असो, दिवाळीत मिठाई घेणे अपरिहार्य आहे.
चितळे बंधू, काका हलवाई, मिठास, मुळचंद ही काही प्रसिद्ध मिठाई ची दुकाने.

चितळे बंधू मिठाईवाले
https://g.co/kgs/Gud9xHv

Kaka Halwai Sweet Centre
https://g.co/kgs/QtTb7v3

Mithas Sweets – Kothrud
https://g.co/kgs/6gD8KnV

Mulchand Mithaiwale
https://g.co/kgs/fdke385

पुणे शहरासाठी आणखी दोन नवे मेट्रो मार्ग 

Spread the love

2 thoughts on “Diwali shopping in pune 2024 | पुण्यात दिवाळी ची खरेदी कुठे करावी?”

Leave a Comment