Atul parchure death: मराठी सिनेसृष्टीतील धक्कादायक बातमी.प्रसिद्ध अभिनेते अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या ५७व्या वर्षी निधन झाले आहे.
त्यांचे जाणे हे मराठी रंगभूमीसाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी अतिशय दुःखद घटना आहे. अनेक चित्रपट , नाटक,मालिकांमधून त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. आपल्या विनोदी भूमिकांनी त्यांनी आपली खास ओळख निर्माण केली.
अभिनेते अतुल परचुरे दीर्घ काळापासून कॅन्सर ग्रस्त होते परंतू त्यावर त्यांनी मात केली आणि ते बरे झाले. त्यानंतर त्यांनी shooting ला जाण्यास ही सुरुवात केली. कर्करोगावर मात करून नात्यासृष्टीत पुन्हा दमदार entry करावी ह्यासाठी त्यांनी सुर्याची पिल्ले या नाटकाने सुरुवात करायचा निर्णय घेतला.
परंतू पुन्हा त्यांची प्रकृति खालावली आणि आज त्यांच्या निधनाची बातमी समोर आली.
जयवंत वाडकर यांना मोठा धक्का बसला |Atul parchure death
अतुल परचुरे ह्यांच्या निधनाच्या बातमीमुळे चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार अशोक सराफ, जयवंत वाडकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
अभिनेते जयवंत वाडकरांना अतुल परचुरे ह्यांच्या निधनाच्या बातमीमुळे मोठा धक्का बसला. एबीपी माझाला प्रतिक्रिया देत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.त्यांनी सांगीतले की,सूर्याची पिल्ले नाटाकाची तालीम सुरु असताना.. पाच दिवसांपूर्वी त्याला पुन्हा त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना पुन्हा अॅडमिट करण्यात आलं. तो पुन्हा येईल अशी अपेक्षा होती पण यावर काय बोलावं हेच सुचत नाहीये. नववीत असल्यापासून आम्ही एकत्र काम करत होतो. तेव्हापासूनची आमची मैत्री. आमचा मित्र खूप लवकर गेला .
अशोक सराफ यांनी खूप वाईट गोष्ट घडली अशी प्रतिक्रिया दिली !
अशोक सराफ यांनी,” ही सहन होण्यासारखी गोष्ट नाही” अशी प्रतिक्रिया दिली. ही अतिशय वाईट गोष्ट घडली.सिनेसृष्टीने एक अत्यंत चांगला अभिनेता गमावला आहे. असं नव्हतं व्हायला पाहिजे, फार छान अभिनेता ,फार चांगला मुलगा होता. माझा अत्यंत आवडता आणि जवळचा मित्र होता. एका चित्रपटात त्याने माझ्या लहानपणीची भूमिका केली होती.केलं होतं आणि हे विसरणे शक्य नाही, अशी त्यांनी एबीपी माझाला दिली.
डॉक्टरांनी केले चुकीचे उपचार नक्की काय झालं ?
आपल्या विनोदी भूमिकांनी त्यांनी आपली खास ओळख निर्माण केली.
अभिनेते अतुल परचुरे दीर्घ काळापासून कॅन्सर ग्रस्त होते परंतू त्यावर त्यांनी मात मिळवता आली नाही. असे असतानाही माझ्यावर डॉक्टरने चुकूचे उपचार केले होते असा आरोप स्वतः अतुल परचुरे यांनी एक नुकत्याच झालेल्या त्यांच्या मुलाखती मध्ये दिल होता
या मुलाखती मध्ये एक धक्कादायक खुलासा अतुल परचुरे यांनी केला होता ” जेव्हा त्यांना कॅन्सर ची लक्षणे आढळली तेव्हा त्यांच्या डॉक्टरकडे तपासणी साथी गेल्यावर तिथे सुरवातीला डॉक्टरांनी चुकीचे निदान केले आणि त्यामूळे त्यांची तब्यात खूप ढासळली.
2 thoughts on “Atul parchure death | प्रसिद्ध अभिनेते अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन ”