70th Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024 Pune:पुण्यातील संगीतप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे! 70 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आजपासून म्हणजेच 18 डिसेंबर 2024 पासून सुरू होत आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळाने या प्रतिष्ठित भारतीय शास्त्रीय संगीत महोत्सवासाठी कलाकारांची अधिकृत घोषणा केली आहे. महोत्सव महाराष्ट्र मंडळ क्रीडा संकुल, मुकुंदनगर, पुणे येथे 18 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2024 या कालावधीत पार पडणार आहे.
महोत्सवाचा वारसा आणि परंपरा | Sawai Gandharva Bhimsen Mahotsav
आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी महोत्सवाच्या समृद्ध परंपरेवर भर दिला. त्यांनी सांगितले, “माझे वडील, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी त्यांच्या गुरुंच्या सन्मानार्थ या महोत्सवाची सुरुवात केली. आजही हा महोत्सव दिग्गज कलाकार आणि नवोदित प्रतिभांना एक समान व्यासपीठ उपलब्ध करून देतो, ज्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीत टिकून राहते.”
यावेळी मंडळाचे सचिव मुकुंद संगोराम, विश्वस्त शिल्पा जोशी, तसेच आनंद भाटे, शुभदा मुळगुंद, डॉ. प्रभाकर देशपांडे, आणि मिलिंद देशपांडे हेही उपस्थित होते.
Sawai Gandharva Bhimsen Mahotsav Schedule (2024): कार्यक्रमाची यादी
पहिला दिवस: बुधवार, 18 डिसेंबर (दुपारी 3 ते रात्री 10)
- शहनाई वादन: डॉ. एस. बाळेश आणि डॉ. कृष्णा बाळेश
- गायन: शश्वती चव्हाण-झुरंगे, राम देशपांडे, आणि पं. अजय चक्रवर्ती
- व्हायोलिन वादन: डॉ. एल. सुब्रह्मण्यम (कर्नाटक संगीत)
दुसरा दिवस: गुरुवार, 19 डिसेंबर (सायंकाळी 4 ते रात्री 10)
- जुगलबंदी: कृष्णा बोंगाणे आणि नागेश अडगावकर
- गायन: संगीता कत्ती-कुलकर्णी आणि पं. वेंकटेश कुमार
- सतार वादन: अनुपमा भगवत
तिसरा दिवस: शुक्रवार, 20 डिसेंबर (सायंकाळी 4 ते रात्री 10)
- मोहिनी म्युझिक एनसेंबल: सहाना बॅनर्जी, रुचिरा केदार, सावनी तालवलकर, अनुजा बोरुडे-शिंदे आणि अदिती गारडे
- गायन: वीरज जोशी आणि कौशिकी चक्रवर्ती (रिषित देशिकन यांच्यासोबत)
- सतार वादन: पुरबायन चॅटर्जी
चौथा दिवस: शनिवार, 21 डिसेंबर (सायंकाळी 4 ते मध्यरात्री 12)
- गायन: सौरभ कडगावकर आणि आनंद भाटे
- सरोद जुगलबंदी: अयान अली बंगश आणि अमान अली बंगश
- बासरी वादन: राकेश चौरासिया
- गायन: आरती अंकलिकर-टिकेकर आणि पं. उल्हास कशाळकर
पाचवा दिवस: रविवार, 22 डिसेंबर (दुपारी 12 ते रात्री 10)
- गायन: संजय अभ्यंकर आणि मिलिंद चिटळे
- कर्नाटक संगीत जुगलबंदी: शशांक सुब्रह्मण्यम (फ्लूट) आणि आर. कुमरेश (व्हायोलिन)
- पियानो वादन: अदनान सामी
- भरतनाट्यम नृत्य: शोभना
- श्रद्धांजली कार्यक्रम: डॉ. प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली – त्यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या सांगीतिक कार्यक्रमाद्वारे
70th Sawai Gandharva Bhimsen Mahotsav ticket prices and booking website: तिकिटांची माहिती
या महोत्सवासाठी तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. संगीतप्रेमींना महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी विविध प्रकारचे तिकीट पर्याय दिले गेले आहेत:
तिकिटाचे प्रकार आणि किंमती (Season Pass):
- फ्रंट चेअर – सीझन पास: ₹5000
- बॅक चेअर – सीझन पास: ₹3000 (सोल्ड आऊट)
- भारतीय बैठक – सीझन पास: ₹500
तिकिटे तुम्ही ticketkhidkee.com वरुण खरेदी करू शकता.
नवोदित कलाकारांचा सहभाग | New Artists and Esteemed Sponsors In Sawai Gandharva Bhimsen Mahotsav
यावर्षी महोत्सवात अनेक नवोदित कलाकार पहिल्यांदाच सादरीकरण करणार आहेत, ज्यामध्ये शश्वती चव्हाण-झुरंगे, कृष्णा बोंगाणे, रिषित देशिकन, आणि अदनान सामी यांचा समावेश आहे.
Sawai Gandharva Bhimsen Mahotsav Sponsors
हा महोत्सव विविध नामांकित प्रायोजकांच्या पाठिंब्याने साकारला जातो. यामध्ये किरणोसकर ग्रुप, नांदेड सिटी, पी. एन. गाडगीळ आणि सन्स, केळे रियल्टर्स, आणि लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांचा समावेश आहे.
पाच दिवसांच्या सांगीतिक सोहळ्याचा अनुभव घ्या!
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हे केवळ एक संगीत महोत्सव नाही, तर भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा आणि वारसा जपणारा एक महत्त्वाचा सोहळा आहे. येथे दिग्गज कलाकारांसह नवोदितांना एकच मंच मिळतो, जिथे भारतीय संगीताची विविधता आणि सर्जनशीलता दिसून येते.
संगीतप्रेमींसाठी हा महोत्सव म्हणजे एक पर्वणी आहे, जिथे तुम्हाला संगीत, नृत्य, आणि भारतीय परंपरेचा मिलाफ अनुभवता येतो. पुण्यातील सांगीतिक परंपरेचा वारसा पुढे नेणाऱ्या या महोत्सवात सहभागी होण्याची संधी चुकवू नका!
हे पण वाचा :
FAQs: सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 2024 बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
1. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव कधी आणि कुठे होणार आहे?
महोत्सव 18 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2024 या कालावधीत महाराष्ट्र मंडळ क्रीडा संकुल, मुकुंदनगर, पुणे येथे होणार आहे.
2. महोत्सवाचे मुख्य आकर्षण काय आहे?
यावर्षीच्या महोत्सवात दिग्गज कलाकारांचे सादरीकरण, सरोद व सतार जुगलबंदी, कर्नाटक संगीत, बासरी वादन, आणि भरतनाट्यम नृत्य हे प्रमुख आकर्षण आहेत.
3. तिकिटांचे दर किती आहेत?
तिकिटाचे प्रकार:
फ्रंट चेअर पास: ₹5000
बॅक चेअर पास: ₹3000
भारतीय बैठक पास: ₹500
4. कोणते नवोदित कलाकार पहिल्यांदाच सादरीकरण करणार आहेत?
यावर्षी शश्वती चव्हाण-झुरंगे, कृष्णा बोंगाणे, रिषित देशिकन, आणि अदनान सामी हे कलाकार पहिल्यांदा सादरीकरण करणार आहेत.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 2024 चुकवू नका – भारतीय शास्त्रीय संगीताचा अमूल्य ठेवा अनुभवण्याची ही अनोखी संधी आहे!
2 thoughts on “70th Sawai Gandharva Bhimsen Mahotsav Starts From Today – जाणून घ्या वेळापत्रक, कलाकारांची यादी, आणि तिकिटांचे तपशील!”