21 Bangladeshi Illegal Immigrants Arrested From pune: पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरातील बांधकाम ठिकाणी बेकायदेशीरपणे राहत असलेल्या २१ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण पुणे शहरापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या कारेगाव भागात बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. अटक केलेल्यांमध्ये १५ पुरुष, ४ स्त्रिया आणि २ तृतीयपंथीय व्यक्तींचा समावेश आहे.
गस्त घालणाऱ्या पोलिसांना मिळालेली माहिती | 21 Bangladeshi Illegal Immigrants Arrested
पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवादविरोधी कक्षाच्या अधिकाऱ्यांना गस्त घालत असताना काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक ( Anti-Terrorism Cell of the Pune rural police, assistant police inspector )प्रकाश पवार आणि सहायक उपनिरीक्षक (assistant sub-inspector)विशाल गव्हाणे यांनी ही माहिती मिळताच त्यांनी तत्काळ कारवाई केली.
प्राथमिक तपासात आलेले निष्कर्ष |21 Bangladeshi Illegal Immigrants Arrested From pune
प्राथमिक तपासात असे आढळले की या बांगलादेशी नागरिकांनी विविध कालावधीत भारतात प्रवेश केला होता. काहीजण गेल्या सहा महिन्यांपासून भारतात होते, तर काहीजण गेल्या दहा वर्षांपासून बेकायदेशीररित्या राहत होते. त्यापैकी अनेक जण बांधकाम मजूर आणि सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते.
बनावट दस्तावेजांचा वापर | 21 Bangladeshi Illegal Immigrants Arrested From pune
तपासादरम्यान पोलिसांनी काही आरोपींकडून मतदार ओळखपत्र, Adhar card कार्ड आणि पॅन कार्ड (PAN Card)जप्त केली आहेत. ही कागदपत्रे आरोपींनी बनावट पद्धतीने मिळवली असल्याचा संशय आहे. पोलिसांच्या मते, या बांगलादेशी नागरिकांनी सागरी तसेच जमिनीच्या मार्गाने भारतात प्रवेश केला होता.
रॅकेटचा तपास सुरू |21 Bangladeshi Illegal Immigrants Arrested From pune
या नागरिकांना बेकायदेशीरपणे भारतात आणणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा तपास सुरू आहे. पोलिसांना यामागे एक संघटित गट कार्यरत असल्याचा संशय आहे, जो नागरिकांना भारतात आणून त्यांच्याकडून बेकायदेशीर कामे करून घेत आहे.
आरोपींवर गुन्हा दाखल | FIR Registered Against Accused
रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी महादेव वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींवर भारतीय दंड संहिता (बीएनएस), पासपोर्ट कायदा आणि परदेशी कायदा(Bharatiya Nyaya Sanhita (BNS), the Passports Act and the Foreigners Act.) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून लवकरच आणखी माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे.
बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा गंभीर | Bangladeshi Illegal Immigrants Issue Became serious
या घटनेनंतर पुन्हा एकदा भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या नागरिकांचा मुद्दा चर्चेत आला आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे देशाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाला या मुद्द्याचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती पावले उचलावी लागणार आहेत.
श्वेता शालिनी (Shweta Shalini )
BJP Spokesperson & State Prabhari -Social Media & IT, Maharashtra Media Prabhari- Telangana, Strategist Entrepreneur, Speaker, Columnist). यांनी x (twitter) यावरती हि प्रतिकिर्या दिली.
पुणे, महाराष्ट्र: रांजणगाव परिसरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे शिर्डी मतदारसंघात येते- अशा प्रकारे ते त्यांचे मतदार वाढवतात.
1 thought on “21 Bangladeshi Illegal Immigrants Arrested From pune | पुण्यात बेकायदेशीर वास्तव्यासाठी 21 बांगलादेशींना अटक”